वाणिज्य शाखेच्या निकालावर विशेष लक्ष, उत्तरपत्रिका तपासणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 04:01 AM2018-01-22T04:01:46+5:302018-01-22T04:02:08+5:30
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने सध्या वाणिज्य शाखेच्या उत्तरपत्रिकांवर लक्ष केंद्रित केले आहे. उन्हाळी सत्राच्या परीक्षेमध्ये वाणिज्य शाखेच्या निकालाला सर्वाधिक उशीर झाला होता. त्यानंतर आॅनलाइन तपासणी पद्धतीत सुधारणा केली आहे, तसेच वाणिज्य शाखेचे विद्यार्थी अधिक असल्याने कटाक्षाने विद्यापीठाने वाणिज्य शाखेच्या उत्तरपत्रिका तपासणी सुरू केली आहे.
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने सध्या वाणिज्य शाखेच्या उत्तरपत्रिकांवर लक्ष केंद्रित केले आहे. उन्हाळी सत्राच्या परीक्षेमध्ये वाणिज्य शाखेच्या निकालाला सर्वाधिक उशीर झाला होता. त्यानंतर आॅनलाइन तपासणी पद्धतीत सुधारणा केली आहे, तसेच वाणिज्य शाखेचे विद्यार्थी अधिक असल्याने कटाक्षाने विद्यापीठाने वाणिज्य शाखेच्या उत्तरपत्रिका तपासणी सुरू केली आहे.
हिवाळी सत्रात वाणिज्य आणि मॅनेजमेंटच्या एकूण ६६ परीक्षा विद्यापीठाने घेतल्या आहेत. आतापर्यंत त्यापैकी १५ परीक्षांचे निकाल विद्यापीठाने जाहीर केले आहेत. अजूनही विद्यापीठासमोर ५१ परीक्षांच्या निकालाचे आव्हान आहे. निकाल वेळेवर लागावेत, यासाठी मुंबई विद्यापीठाने आता कंबर कसली आहे. आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीतील तांत्रिक त्रुटी दुरुस्त करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता उत्तरपत्रिका स्कॅनिंग आणि तपासणीमधील अडथळे दूर झाले आहेत, पण याचबरोबरीने उत्तरपत्रिका तपासणीसाठी आता विद्यापीठाने तब्बल ३ हजार २५३ प्राध्यापकांना काम दिले आहे.
वाणिज्य शाखेला विद्यार्थी अधिक असतात. त्यामुळे त्यांच्या उत्तरपत्रिका तपासणीकडे अधिक लक्ष देण्यात आले आहे. उन्हाळी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीत प्राध्यापकांची कमतरता आणि तांत्रिक बिघाडामुळे खूपच गोंधळ उडाला होता.