लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : केंद्र सरकारने नगरविकासावर भर दिला आहे. नवीन योजनांमुळे गुंतवणुकीला चालना मिळेल. पायाभूत सुविधा वाढविल्यामुळे ग्रामीण आणि शहरीकरण यामधील दरी कमी होण्यास मदत हाेईल. पर्यटन, उद्याेग, वाहतूक वाढीस लागेल, अशी अपेक्षा आहे. रेल्वे, मेट्रो, बस यांचे प्रकल्प सुरू आहेत. सोबतच शिक्षण आणि आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी सरकारने प्राधान्य दिले आहे.
* गृहकर्ज घेणाऱ्यांना दिलासा, व्याजावरील सवलत वाढवली
- मालमत्ता क्षेत्राला चालना देण्यासाठी परवडणाऱ्या घरांसाठी सेक्शन ८०ईईएअंतर्गत मिळणाऱ्या दीड लाखांपर्यंतच्या अतिरिक्त सवलतीची मर्यादा १ वर्षापर्यंत वाढवण्यात आली आहे. या याेजनेचा फायदा ग्राहकांना ३१ मार्च २०२२ पर्यंत घेता येईल. रेंटल हाउसिंगवरील करसवलत वाढवण्यात आली आहे. परवडणाऱ्या घरांचे प्रकल्प हाती घेतलेल्या बांधकाम व्यावसायिकांनाही आणखी एक वर्ष करसवलत मिळणार आहे.
- सरकार आपल्या मालमत्ता विकून निधी उभारणार आहे. हा निधी पायाभूत सुविधा आणि रिअल इस्टेटसाठी वापरला जाईल. त्यामुळे या क्षेत्राला उभारी घेता येईल. स्मार्ट सिटीमध्ये डाटाच्या माध्यमातून नियंत्रण येईल. भ्रष्टाचाराला आळा बसेल. लोकांना रोजगार उपलब्ध होईल, अशी अपेक्षा वर्तवण्यात आली आहे.