शिष्यवृत्ती वाटप गैरप्रकरणी विशेष चौकशी पथक

By Admin | Published: March 5, 2017 02:07 AM2017-03-05T02:07:14+5:302017-03-05T02:07:14+5:30

केंद्र सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती वाटपात राज्यात गैरव्यवहार कसे झाले, याबाबत अधिक तपास करण्यासाठी गृहविभागाने विशेष चौकशी पथक

Special Investigation Team for non-disclosure of scholarship allocation | शिष्यवृत्ती वाटप गैरप्रकरणी विशेष चौकशी पथक

शिष्यवृत्ती वाटप गैरप्रकरणी विशेष चौकशी पथक

googlenewsNext

मुंबई : केंद्र सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती वाटपात राज्यात गैरव्यवहार कसे झाले, याबाबत अधिक तपास करण्यासाठी गृहविभागाने विशेष चौकशी पथक स्थापन केले आहे. सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागातर्फे मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती वाटप आणि शिक्षण शुल्क वाटप करण्यात येते, यामध्ये गैरव्यवहार होत असल्याने चौकशी करण्यात येणार आहे.
नागपूर पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकाला चौकशीसाठी ६० दिवसांचा कालावधी दिला आहे. या प्रकरणी चौकशीसाठी आधी देण्यात आलेली मुदत १४ फेब्रुवारी रोजी संपुष्टात आली. आता स्थापन करण्यात आलेल्या चौकशी पथकास १४ एप्रिलपर्यंतची मुदतवाढ दिली आहे. मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती आणि शिक्षण शुल्क वाटपातील अनियमितता आणि गैरव्यवहार प्रकरण मोठे असल्याने, या प्रकरणाची चौकशी मार्च २०१६ मध्ये चौकशी सुरू झाली होती. १९ मार्च २०१६ला चौकशीसाठी मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर, १६ एप्रिलला पुन्हा २ महिन्यांची मुदतवाढ दिली. १२ जुलैला या प्रकरणी चौकशीसाठी ६ महिन्यांची मुदतवाढ दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Special Investigation Team for non-disclosure of scholarship allocation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.