अंगारकी चतुर्थीनिमित्त पश्चिम रेल्वेमार्गावर रात्रकालीन विशेष लोकल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 06:19 AM2019-09-15T06:19:24+5:302019-09-15T06:19:38+5:30

अंगारकी चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते.

Special local overnight train on the Western Railway for Angarki Chaturthi | अंगारकी चतुर्थीनिमित्त पश्चिम रेल्वेमार्गावर रात्रकालीन विशेष लोकल

अंगारकी चतुर्थीनिमित्त पश्चिम रेल्वेमार्गावर रात्रकालीन विशेष लोकल

googlenewsNext

मुंबई : अंगारकी चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. या प्रवाशांच्या सुविधेसाठी पश्चिम रेल्वे प्रशासनातर्फे १७ सप्टेंबर (सोमवार-मंगळवार)च्या रात्री एक विशेष लोकल चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अंगारकी चतुर्थीनिमित्त उपलब्ध करून देण्यात आलेली ही विशेष लोकल चर्चगेटहून १ वाजून ३० मिनिटांनी धिम्या मार्गावरून सुटेल, तर विरार स्थानकावर ३ वाजून ०६ मिनिटांनी पोहोचेल, असे पश्चिम रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे. या लोकलमुळे भल्या पहाटे सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांची सोय होणार आहे.

Web Title: Special local overnight train on the Western Railway for Angarki Chaturthi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.