मुंबई : अंगारकी चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. या प्रवाशांच्या सुविधेसाठी पश्चिम रेल्वे प्रशासनातर्फे १७ सप्टेंबर (सोमवार-मंगळवार)च्या रात्री एक विशेष लोकल चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.अंगारकी चतुर्थीनिमित्त उपलब्ध करून देण्यात आलेली ही विशेष लोकल चर्चगेटहून १ वाजून ३० मिनिटांनी धिम्या मार्गावरून सुटेल, तर विरार स्थानकावर ३ वाजून ०६ मिनिटांनी पोहोचेल, असे पश्चिम रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे. या लोकलमुळे भल्या पहाटे सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांची सोय होणार आहे.
अंगारकी चतुर्थीनिमित्त पश्चिम रेल्वेमार्गावर रात्रकालीन विशेष लोकल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 6:19 AM