मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्था, फेडरेशन, मुंबई यांची गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकाससंदर्भात सभासदांची विषेश सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2023 12:06 PM2023-03-06T12:06:32+5:302023-03-06T12:06:59+5:30

संस्थेच्या पुनर्विकास करण्याच्या प्रक्रियेतील खरे मुद्दे आणि मागण्या शासनासमोर मांडण्याची निकड व्यक्त केली आणि फेडरेशनला पाठिंबा दिला.

special meeting of members of backward class co operative housing societies federation mumbai regarding redevelopment of housing societies | मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्था, फेडरेशन, मुंबई यांची गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकाससंदर्भात सभासदांची विषेश सभा

मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्था, फेडरेशन, मुंबई यांची गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकाससंदर्भात सभासदांची विषेश सभा

googlenewsNext

मुंबई: पी.डब्ल्यू.आर.-219 योजनेअंतर्गत येणा-या सर्व मागासवर्गीय गृहनिर्माण सहकारी संस्थाना पुनर्विकास प्रक्रियेत येणा-या समस्या शासनासमोर मांडण्यासाठी तसेच त्यांचे निरसन करून सदर संस्थांचा पुनर्विकास सुलभ होण्याकरीता  आणि पुनर्विकास करण्यासंबंधी शासनाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळण्याकरीता त्याचप्रमाणे  मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्थांना एकत्र आणण्यासाठी सदर संस्थांच्या पदाधिकारी यांच्याशी समन्वय साधण्यासाठी आत्मारामजी पाखरे,अध्यक्ष, मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्था, फेडरेषन , मुंबई यांनी दिनांक 25 फेब्रुवारी 2023 रोजी बैठक बोलवली होती.  सदर सभेत अनेक मान्यवर उपस्थित होते.  गुरूकुल एन्फ्रा ग्रुपचे व्यवस्थापकीय  संचालक राज बी गुलाटी यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते. राज बी गुलाटी यांनी सदर प्रकरणी त्यांचे विचार व्यक्त केले.

लक्षात घेण्याची बाब म्हणजे सामाजिक न्याय आणि कल्याण विभागाअंतर्गत मागासवर्गीय प्रवर्गासाठी मुंबईत सुमारे 137 सोसायट्या आणि महाराष्ट्र राज्यात 3000 हून अधिक सोसायट्या आहेत. सर्व सोसायट्या 35 ते 40 वर्शे जुन्या आहेत आणि बहुतांशी अतिशय जीर्ण अवस्थेत आहेत. तथापि मागासवर्गीय संस्थांचे वाटप तसेच संस्थेतील सभासदांच्या सदस्यत्वाच्या पात्रतेचे कठोर नियमांचे संस्थेच्या पुनर्विकास परवानगीसाठी अनुपालन करणे अत्यंत कठीण आहे. बहुसंख्य सोसायटी सदस्यांनी सभेला हजेरी लावली आणि त्यांच्या व्यथा आणि तातडीच्या गरजा मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्था , फेडरेशन , मुंबई यांच्याकडे व्यक्त केल्या आणि त्यांचे संस्थेच्या पुनर्विकास करण्याच्या प्रक्रियेतील खरे मुद्दे आणि मागण्या शासनासमोर मांडण्याची निकड व्यक्त केली आणि फेडरेशनला पाठिंबा दिला.

राज बी गुलाटी गेले 15 वर्शांपासून विकासक म्हणून कार्यरत असून जिल्हाधिकारी आणि सामाजिक न्याय आणि कल्याण विभागाअंतर्गत येणारे प्रकल्प विकसित करीत आहेत, त्यामुळे ते पुनर्विकासाचे नियम आणि कार्यपध्दतीत चांगलेच पारंगत आहेत आणि पुनर्विकास प्रकियेसंदर्भात त्यांनी ब-याच गृहनिर्माण संस्थाना अतिशय मोलाचे मार्गदर्शन आणि समर्थन केलेले असून मागासवर्गीय श्रेणीतील सोसायट्यांचा पुनर्विकासचा दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न सोडवून अनेक गृहनिर्माण संस्थाना पुनर्विकास प्रकियेत पाठिंबा दिलेला आहे. संस्थेचा पुनर्विकास कोण करीत आहे हे महत्वाचे नसून सर्वात महत्वाचे म्हणजे प्रत्येक सभासदाला त्यांच्या रहाणीमानाप्रमाणे तसेच त्यांच्या समस्यांचे निराकरण करून त्यांना लवकरात लवकर पुनर्विकासाद्वारे उत्कृष्ट दर्जाचे नवीन घर प्रदान करणे हे महत्वाचे आहे असे मत राज बी गुलाटी यांनी व्यक्त केले. त्याचप्रमाणे बहुतेक सोसायट्या अत्यंत धोकादायक आणि पूर्णपणे ढासळलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे जिवाला आणि मालमत्तेला धोका असताना आणि सदर सोसायट्यांचा पुनर्विकास हाच एकमेव उपाय आहे आणि सध्याची गरज आहे असेही विचार त्यांनी मांडले. सर्व सदस्यांनी राज बी गुलाटी यांच्या मार्गदर्शनाचे कौतुक केले  आणि त्यांच्या चांगल्या पुनर्वसन आणि उन्नतीच्या या कार्यास पाठिंबा व्यक्त केला.

सभेशेवटी फेडरेशनचे अध्यक्ष आत्मराम पाखरे यांच्याही  कार्याचे  कौतुक करून आणि आभार मानून योग्य, न्याय आणि इष्ट उपायांद्वारे मागासवर्गीय प्रवर्गातील सोसायटयांच्या पुनर्विकासाच्या सर्व मुद्दयांवर पाठपुराव करण्याचा निर्धार करून बैठक सकारात्मकतेने संपली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: special meeting of members of backward class co operative housing societies federation mumbai regarding redevelopment of housing societies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई