Nawab Malik: मोठी बातमी! नवाब मलिकांचे दाऊदच्या टोळीशी थेट संबंध असल्याचे पुरावे; कोर्टाचे निरीक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 11:04 AM2022-05-21T11:04:12+5:302022-05-21T11:38:56+5:30

Nawab Malik: मनी लाँडरिंग प्रकरणात कारागृहात असलेल्या नवाब मलिकांचा पाय आणखी खोलात गेला आहे.

special pmla court said there is prima facie evidence to indicate that nawab malik directly knowingly involved in money laundering | Nawab Malik: मोठी बातमी! नवाब मलिकांचे दाऊदच्या टोळीशी थेट संबंध असल्याचे पुरावे; कोर्टाचे निरीक्षण

Nawab Malik: मोठी बातमी! नवाब मलिकांचे दाऊदच्या टोळीशी थेट संबंध असल्याचे पुरावे; कोर्टाचे निरीक्षण

googlenewsNext

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) आताच्या घडीला आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपाखाली तुरुंगात आहेत. यातच आता नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईतल्या गोवावाला कम्पाऊंडला हडप करण्यासाठी नवाब मलिक यांचे दाऊदच्या टोळीशी थेट संबंध असल्याचे सकृतदर्शनी पुरावे आहेत, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. मुंबई विशेष न्यायालयात यासंदर्भातील याचिकेवरील सुनावणीवेळी न्यायालयाने काही गोष्टी स्पष्ट असल्याचे म्हटले आहे. ईडीने मलिक यांच्या विरोधात दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल न्यायालयाने घेतली. 

मनी लाँडरिंग प्रकरणात कारागृहात असलेल्या नवाब मलिकांचा पाय आणखी खोलात गेल्याचे सांगितले जात आहे. विशेष न्यायालयाने मलिकांविरुद्धच्या खटल्यावर सुनावणी करताना ईडीने सादर केलेल्या दोषारोपपत्राची दखल घेतली. नवाब मलिक हे जाणूनबुजून आणि थेट मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात सहभागी असल्याचेही यावेळी न्यायालयाने नमूद केले आहे. 

डी-गँगशी संबंध ठेवूनच मलिकांनी गोवावाला कंपाऊंडची जागा मिळवली

या प्रकरणाची सुनावणी विशेष न्यायाधीश आर.एन.रोकडे यांच्या न्यायालयात झाली. नवाब मलिक हे हसीना पारकर, सलीम पटेल, सरदार शहावली खान यांच्या संपर्कात असल्याचीही माहिती आहे. तर डी-गँगशी संबंध ठेवूनच मलिकांनी गोवावाला कंपाऊंडची जागा मिळवली. या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी पुरेशी कारणे आहेत. या प्रकरणात नवाब मलिक जाणीवपूर्वक सहभागी असल्याचे प्रथमदर्शनी पुराव्यांवरून समोर आले आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. 

ईडीने चार्टशीटमध्ये १७ जणांना साक्षीदार बनवले

ईडीने आपल्या चार्टशीटमध्ये १७ जणांना साक्षीदार बनवले आहे. त्यात दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर आणि हसीना पारकरचा मुलगा अलीशाह पारकर यांच्यासह सरदार शाहवली खान यांच्या जबाबांचाही समावेश आहे. हसीना पारकर दाऊद इब्राहिमच्या जवळची होती आणि सलीम पटेल पारकरचा अंगरक्षक होता, असे शाहवली खानने आपल्या वक्तव्यात सांगितले. मालमत्तेबाबतचा प्रत्येक निर्णय हा हसीना पारकर यांच्या सूचनेनुसार पटेल यांनी घेतला, असेही सांगितले.


दरम्यान, २१ एप्रिल रोजी ईडीने मलिक यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते. कुर्ल्यातील गोवावाला कंपाऊंड ताब्यात घेण्यासाठी नवाब मलिक आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर आणि त्यांचा अंगरक्षक सलीम पटेल यांच्यात अनेक बैठका झाल्याचेही पुढे आले आहे. दोषारोपपत्राची दखल घेत विशेष न्यायालयाने नवाब मलिक आणि १९९३ च्या बॉम्बस्फोटातील दोषी आणि सरदार शाहवली खान यांच्याविरुद्धची कारवाई पुढे चालू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. 
 

Web Title: special pmla court said there is prima facie evidence to indicate that nawab malik directly knowingly involved in money laundering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.