हरविलेल्या महिलांच्या शोधासाठी राज्यात पोलिसांची विशेष मोहीम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:06 AM2021-01-14T04:06:51+5:302021-01-14T04:06:51+5:30

* सोमवारपासून प्रारंभ लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : घरातून निघून गेलेल्या, हरविलेल्या लहान मुलांच्या शोधासाठी पोलिसांकडून नेहमीच मोहीम राबविली ...

Special police operation in the state to search for missing women! | हरविलेल्या महिलांच्या शोधासाठी राज्यात पोलिसांची विशेष मोहीम!

हरविलेल्या महिलांच्या शोधासाठी राज्यात पोलिसांची विशेष मोहीम!

Next

* सोमवारपासून प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : घरातून निघून गेलेल्या, हरविलेल्या लहान मुलांच्या शोधासाठी पोलिसांकडून नेहमीच मोहीम राबविली जात आहे. मात्र, आता त्याच्याबरोबर १८ वर्षांवरील बेपत्ता महिलांच्या शोधासाठी विशेष अभियान घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्र पोलिसांच्या सर्व घटकांमध्ये १८ ते ३१ जानेवारी या कालावधीत ही मोहीम राबविली जात असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

राज्यातील महिलांच्या सुरक्षेबद्दल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यामध्ये लहान मुलांच्या शोधासाठी ज्याप्रमाणे ‘ऑपरेशन मुस्कान’ राबविले जाते. तशाच पद्धतीने १८ वर्षांवरील तरुणी, महिला हरविलेल्या आहेत, त्यांचासाठी विशेष मोहीम राबविण्याची सूचना त्यांनी केली. त्यानुसार सर्व पोलीस ठाण्यांत यासंबंधी दाखल गुन्ह्याची एकत्रित माहिती संकलित केली जात आहे. १८ ते ३१ जानेवारी या कालावधीत सर्व पोलीस घटकांमध्ये विशेष पथके बनविली जातील.

Web Title: Special police operation in the state to search for missing women!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.