फूड ट्रकसाठी विशेष धोरण आखा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अधिका-यांना निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 05:03 AM2017-09-19T05:03:25+5:302017-09-19T05:03:27+5:30
बदलत्या जीवनशैलीसाठी फूड ट्रक ही उत्तम संकल्पना आहे. कार्यालये, पर्यटनस्थळे आदी ठिकाणी ताजे आणि गरमागरम खाद्यपदार्थ ग्राहकांना मिळू शकतील. अशा फूड ट्रकच्या माध्यमातून स्वयंसहायता बचत गटांनाही फायदा मिळू शकतो.
मुंबई : बदलत्या जीवनशैलीसाठी फूड ट्रक ही उत्तम संकल्पना आहे. कार्यालये, पर्यटनस्थळे आदी ठिकाणी ताजे आणि गरमागरम खाद्यपदार्थ ग्राहकांना मिळू शकतील. अशा फूड ट्रकच्या माध्यमातून स्वयंसहायता बचत गटांनाही फायदा मिळू शकतो. त्यामुळे फूड ट्रकसाठी विशेष धोरण तयार करावे, असे निर्देश सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिका-यांना दिले.
नॅशनल रेस्टॉरंट आॅफ इंडियाच्या पदाधिका-यांनी आपल्या विविध मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी हॉटेल व्यवसायाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. या उद्योगाला लागणाºया परवान्यांची संख्या कमी करण्यासह त्यात सुलभता आणण्याचे आश्वासन त्यांनी दिले. मुंबई महापालिकेनेही परवान्यांची संख्या कमी करण्याच्या दृष्टीने काम सुरू केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.