अकरावी प्रवेशाची विशेष फेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 05:17 AM2018-08-10T05:17:24+5:302018-08-10T05:17:30+5:30
दहावीत चांगले गुण मिळाले असूनही अद्याप इयत्ता अकरावी प्रवेशाच्या ३२ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही.
मुंबई : दहावीत चांगले गुण मिळाले असूनही अद्याप इयत्ता अकरावी प्रवेशाच्या ३२ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही. त्यांना प्रवेश मिळावा यासाठी आता शिक्षण विभागाकडून विशेष फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. १८ आॅगस्ट रोजी त्याची गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. त्यानंतर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य यानुसार आणखी एक आॅनलाइन प्रवेश फेरी घेण्यात येईल. या फेरीमध्ये गुणवत्तेप्रमाणे विद्यार्थ्यांना रिक्त जागांनुसार थेट महाविद्यालय निवडता येणार आहे.
विशेष फेरी कोणासाठी?
पहिल्या चार फेºयांमध्ये प्रवेश न घेतलेले विद्यार्थी, आधीच्या फेºयांत कोणत्या कारणाने प्रवेश नाकारण्यात आलेले विद्यार्थी, गुणवत्ता यादीत नाव येऊनही प्रवेश न घेतलेले, आधीच्या फेºयांत प्रवेश न मिळालेले विद्यार्थी या विशेष फेरीमध्ये सहभागी होऊ शकतील. ज्या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत नाव आल्यानंतर प्रवेश घेऊन नंतर ते रद्द केले, त्यांनाही विशेष फेरीत सहभागी होता येईल.
फेरी प्रवेश मिळालेले विद्यार्थी
पहिली १,२०,५६८
दुसरी ७०,०६३
तिसरी ५४,७२७
चौथी ४९,०६२