Join us

नक्षलग्रस्त भागातील कामगिरीबद्दल १७८८ पोलिसांना विशेष सेवा पदक जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नक्षलग्रस्त भागात उत्कृष्ट कामगिरी बजाविणाऱ्या १७८८ अधिकारी - अंमलदारांना गुरुवारी विशेष सेवा पदक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : नक्षलग्रस्त भागात उत्कृष्ट कामगिरी बजाविणाऱ्या १७८८ अधिकारी - अंमलदारांना गुरुवारी विशेष सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये मुंबईतील अप्पर आयुक्त निषीत मिश्रा, कोल्हापूरचे पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे, अप्पर अधीक्षक मोहितकुमार गर्ग (रत्नागिरी) व अजयकुमार बन्सल (सातारा), आदींचा समावेश आहे.

नक्षलग्रस्त भागातील गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नांदेड व यवतमाळ या ठिकाणी दोन वर्षे आणि राज्य राखीव दलातील अधिकारी व अंमलदारांनी एक वर्ष समाधानकारक सेवा बजाविल्याने त्यांना या पदकाने सन्मानित करण्यात येते. त्यानुसार गेल्या दोन वर्षांतील १७८८ जणांना हे पदक जाहीर झाले आहे. पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल यांनी गुरुवारी त्याबाबतचे आदेश जारी केले.

.................