दिशा कायद्यासाठी विशेष अधिवेशन - देशमुख

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2020 03:36 AM2020-03-15T03:36:01+5:302020-03-15T03:36:15+5:30

महिला अत्याचारांना चाप लावण्याच्या दृष्टीने महिला सुरक्षा आणि सक्षमीकरणासंदर्भातील हा कायदा याच अधिवेशनात आणण्याचे सरकारचे नियोजन होते. मात्र, कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुदतीपूर्वीच संस्थगित करावे लागत आहे.

Special Session for DISHA Law - Anil Deshmukh | दिशा कायद्यासाठी विशेष अधिवेशन - देशमुख

दिशा कायद्यासाठी विशेष अधिवेशन - देशमुख

Next

मुंबई : महिलांवरील अत्याचारांना चाप लावण्यासाठी आंध्र प्रदेशच्या धर्तीवर ‘दिशा’ कायदा आणण्यासाठी विधिमंडळाचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवण्यात येईल, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी विधान परिषदेत एका निवेदनाद्वारे केली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर हे अधिवेशन बोलवण्यात येईल, असेही गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.

महिला अत्याचारांना चाप लावण्याच्या दृष्टीने महिला सुरक्षा आणि सक्षमीकरणासंदर्भातील हा कायदा याच अधिवेशनात आणण्याचे सरकारचे नियोजन होते. मात्र, कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुदतीपूर्वीच संस्थगित करावे लागत आहे. त्यामुळे या कायद्यासाठीचे विधेयक या अधिवेशनात मांडणे शक्य नाही. हा कायदा करताना विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विचार मंथन होणे गरजेचे आहे. त्यामुळे अध्यादेश न आणता दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. महिलांसाठी काम करणाऱ्या संस्थांच्या सूचना जाणून घेतल्या जातील, असेही ते म्हणाले.

Web Title: Special Session for DISHA Law - Anil Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.