Join us

लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांसाठी विशेष सत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सर्व शासकीय आणि महापालिका लसीकरण केंद्रांवर ४ सप्टेंबर रोजी कोविड लसीचा दुसरा डोस घेणाऱ्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सर्व शासकीय आणि महापालिका लसीकरण केंद्रांवर ४ सप्टेंबर रोजी कोविड लसीचा दुसरा डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी विशेष सत्र आयोजित करण्यात आले आहेत. या दिवशी लसीचा पहिला डोस कोणालाही दिला जाणार नाही.

१६ जानेवारीपासून लसीकरण टप्प्याटप्प्याने सुरू आहे. लसीकरण कार्यक्रमांमध्ये १ सप्टेंबरपर्यंत ६९ लाख २६ हजार २५५ लाभार्थ्यांना पहिली मात्रा तर २५ लाख १७ हजार ६१३ लाभार्थ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. कोविडची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर लसीचा दुसरा डोस घेऊन नागरिकांचे लसीकरण पूर्ण होणे आवश्यक आहे. या अनुषंगाने सर्व शासकीय व सार्वजनिक लसीकरण केंद्रांवर विशेष सत्र आहेत. दुसरा डोस देय असणाऱ्या नागरिकांनी या सत्राचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.