Join us

‘टाटा फर्मला पाठविलेल्या बदनामीकारक मेलच्या तपासासाठी विशेष पथक नेमा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 2:33 AM

टाटा फर्मच्या उपकंपनीला बदनामीकारक ई-मेल कोण पाठवत आहे, याचा तपास करण्यासाठी सायबर क्राइममध्ये अनुभवी असलेल्या अधिकाऱ्यांचे विशेष पथक नेमण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले.

मुंबई : टाटा फर्मच्या उपकंपनीला बदनामीकारक ई-मेल कोण पाठवत आहे, याचा तपास करण्यासाठी सायबर क्राइममध्ये अनुभवी असलेल्या अधिकाऱ्यांचे विशेष पथक नेमण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले.न्या. एस.जे. काथावाला यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना या प्रकरणाच्या आतापर्यंतच्या तपासाचा अहवाल आणि विशेष पथकातील अधिकाºयांची नावांसंदर्भात माहिती २२ मेपर्यंत देण्याचे निर्देश नुकतेच दिले. टाटा मोटर्सची उपकंपनी टाटा मोटर्स इन्शुरन्स ब्रोकिंग अ‍ॅण्ड अ‍ॅडव्हायझरी सर्व्हिसेसने (टीएमआयबीएएसएल) दाखल केलेल्या दाव्यावर न्या. एस.जे. काथावाला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होती.दाव्यानुसार, गेल्या वर्षभरात टीएमआयबीएएसएल आणि त्यांच्या ग्रुप कंपन्यांना एका बनावट ई-मेल आयडीवरून कंपनी व त्यांच्या कार्यकारी अधिकाºयांची बदनामी करणारे मेल पाठविले जात आहेत. गेल्या आठवड्यात झालेल्या सुनावणीत टीएमआयबीएएसएलने न्यायालयाला सांगितले की, कंपनीला पाठवण्यात येणारे मेल काहीच दिवसांपूर्वी दिल्ली पोलीस आयुक्तांच्या अधिकृत संकेतस्थळावर पाठविण्यात आले आहेत.दरम्यान, मुंबई सायबर सेलने न्यायालयाला सांगितले की, या प्रकरणी गुगल इंडियाकडे मदत मागितली असून अद्याप तपशिलात माहिती मिळालेली नाही.गेले वर्षभर मुंबई सायबर सेल या प्रकरणाचा तपास करत आहे. तरीही गुन्हेगाराची ओळख पटण्याइतपत तपासात काहीही प्रगती झालेली नाही. सायबर गुन्ह्यांसंदर्भातील तपास करण्यात अनुभवी असलेल्या अधिकाºयांचे विशेष पथक या प्रकरणाचा तपास करण्यासाठी नेमा, असे निर्देश न्या. काथावाला यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना दिले.