खड्डे बुजविण्यासाठी विशेष पथक
By admin | Published: July 3, 2016 03:39 AM2016-07-03T03:39:24+5:302016-07-03T03:39:24+5:30
मुसळधार पावसाने दररोज मुंबई आणखीनच खड्डयात जात आहे़ मुख्य रस्त्यांवरील खड्डयांमुळे वाहतूक मंदावली आहे़ त्यामुळे हे खड्डे तातडीने बुजवण्यासाठी विशेष पथक नेमण्याचा
मुंबई : मुसळधार पावसाने दररोज मुंबई आणखीनच खड्डयात जात आहे़ मुख्य रस्त्यांवरील खड्डयांमुळे वाहतूक मंदावली आहे़ त्यामुळे हे खड्डे तातडीने बुजवण्यासाठी विशेष पथक नेमण्याचा निर्णय पालिका आयुक्त अजय मेहता यांनी शनिवारी घेतला़
गेले काही दिवस मुंबईत सतत मुसळधार पाऊस कोसळत आहे़ यामुळे छोटे व मुख्य रस्तेही खड्डयात गेले आहेत़ दोनच दिवसांत दीडशे खड्डे मुंबईतील रस्त्यांवर पडले आहेत़ १ जुलैपर्यंत २४४ खड्डयांची नोंद झाली आहे़ यापैकी केवळ दोनच खड्डे बुजविण्याचे शिल्लक असल्याचा दावा पालिका अधिकारी करीत आहेत़
प्रत्यक्षात अनेक मुख्य रस्ते आजही खड्डयांत आहेत़ मुसळधार पाऊस सतत कोसळत असल्याने खड्डे भरणे शक्य होत नाही़ (प्रतिनिधी)
जंक्शनवर विशेष लक्ष
रस्त्यावरील जंक्शनवर वाहतुकीचा वेग कमी असतो़ ज्यामुळे वाहतूक कोंडी होण्याचे प्रमाण जास्त असते़ ही बाब लक्षात घेऊन जंक्शनवरच्या खड्डयांबाबत विशेष काळजी घेण्याचे आदेश आयुक्तांनी मासिक आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिले़
कुर्ला विभागात दोन ठिकाणी खड्डे भरणे अजून शिल्लक आहे.
ग्रँटरोड, कुलाबा,भायखळा, अंधेरी, मालाड, चेंबूर या विभागात सर्वाधिक खड्डे आहेत़