Join us

मुंबई महानगर क्षेत्रातील महिलांसाठी सोमवारपासून एसटीची विशेष बससेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 2:14 AM

महिला आणि बालविकासमंत्री अ‍ॅड.यशोमती ठाकूर यांनी मुंबई महानगर क्षेत्रातील महिलांसाठी विशेष बससेवा सुरू करण्याबाबत विनंती केली होती.

मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रात कामानिमित्त प्रवास करणाऱ्या सरकारी सेवेतील महिलांसाठी पनवेल, डोंबिवली, विरार येथून, येत्या सोमवारपासून विशेष एसटी बसेस सुरू करण्यात येत आहेत, अशी माहिती परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड.अनिल परब यांनी दिली.परब म्हणाले की, कोरोनाच्या काळात रेल्वे व इतर सार्वजनिक वाहतूक बंद आहे. या काळात महिलांना कोणतीही अडचण होऊ नये, यासाठी एसटी महामंडळाने येत्या सोमवारपासून सरकारी सेवेतील महिला कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्या कार्यालयीन वेळेनुसार महिला विशेष फेºया सुरू करण्याचा निर्णय घेतला.महिला आणि बालविकासमंत्री अ‍ॅड.यशोमती ठाकूर यांनी मुंबई महानगर क्षेत्रातील महिलांसाठी विशेष बससेवा सुरू करण्याबाबत विनंती केली होती. त्यानुसार, पनवेल ते मंत्रालय (८.१५/१७.४५), डोंबिवली ते मंत्रालय(८.१५/१७.३५) व विरार ते मंत्रालय (७.४५/१७.३५) या वेळेत ही विशेष सेवा सुरू होईल. डोंबिवली, पनवेल, विरार येथून मंत्रालयासाठी प्रत्येकी एक बस महिलांसाठी प्रायोगिक तत्त्वावर चालविण्यात येतील.

टॅग्स :महिलाएसटी