Join us

कोरोनाला मारण्यासाठी विशेष सर्वेक्षण मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2020 4:51 PM

के पूर्व विभागांतर्गत अनेक स्वयंसेवक दिवसभर कार्य करत आहेत.

 

मुंबई : महापालिकेच्या के पूर्व विभागा अंतर्गत विविध विभागात विशेष सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत आहे. सध्या कोरोनाच्या काळात लक्ष सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महापालिकेच्या के पूर्व विभागांतर्गत अनेक स्वयंसेवक दिवसभर कार्य करत आहेत. त्यापैकी मनपाच्या के पूर्व विभागाचे  एमआयडीसी आरोग्य केंद्रातील सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. चारूल संखे व डॉ. श्रेयस पटेल यांच्या अधिपत्याखाली कोरोनाला मारण्यासाठी वेगाने काम सुरु आहे.

सध्या एमआयडीसी, सिप्झ वसाहत, ठाकूर चाळ, आंबेडकर नगर, महेश्वरी नगर, साळवे नगर, गौतम नगर, कोंडीविटे परिसर, गणेशवाडी, मुळगाव डोंगरी, कामगार वसाहत, चकाला कानकिया, चकाला प्रकाश वाडी, मालप्पा डोंगरी, पंप हाऊस, आघाडी नगर, कोंडीविटे केव्हसरोड, सुंदर नगर, सुभाष नगर १/२, या विभागातील आरोग्य सर्वेक्षण, घरोघरी जाऊन नागरिकांना ताप, सर्दी, खोकला, बी.पी.डायबेटिस अन्य आजाराबाबत माहिती घेऊन ती नोंद करण्याचे काम महापालिकेच्या कर्मचाऱ्यासह सुरू आहे.

अनेक विभागात व कपंनी, बँक, बस डेपो, हॉटेल्स व एमआयडीसी पोलिस ठाणे आदी ठिकाणी अँटीजेन व आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली आहे. या कामात के पूर्व विभागातील एमआयडीसी हेल्थ पोस्टच्या सर्व कर्मचारी वर्ग, आरोग्य सेविका आदींनी मेहनत घेतली असून, आरोग्य समन्वयक आनंदराव किटे, सारीपुत नगर येथील स्वयंमसेवक भानुदास सकटे व सुनील बोर्डे, विनोद काकडे, निखिल सुतार अजय साळवे, हेमांगी नाईक आदी लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत भर पावसात देखील कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांच्या लोकवस्तीत घरोघरी जाऊन सर्वेक्षणाचे कार्य करत आहेत.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई