Join us

शिधापत्रिका आणि वितरणासंबंधी तक्रारींच्या निवारणासाठी विशेष प्रणाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2021 4:06 AM

मुंबई : मुंबई आणि ठाणे परिक्षेत्रात शिधापत्रिका आणि वितरणासंबंधी तक्रारींच्या निवारणासाठी विशेष प्रणाली तयार करण्यात आली आहे. १ एप्रिल ...

मुंबई : मुंबई आणि ठाणे परिक्षेत्रात शिधापत्रिका आणि वितरणासंबंधी तक्रारींच्या निवारणासाठी विशेष प्रणाली तयार करण्यात आली आहे. १ एप्रिल ते ३० जून २०२१ या कालावधीत एकूण २७७ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी २३५ तक्रारींचे निवारण करण्यात आले.

सार्वजनिक वितरणव्यवस्थेमध्ये पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने शासनाने स्वतंत्र संकेतस्थळ (www.mahafood.gov.in) तयार केले आहे, तसेच तक्रार निवारण प्रणालीसाठी १८००-२२-४९५०/१९६७ हे टोल फ्री क्रमांक व helpline.mhpds@gov.in ही ई-मेल सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. नागरिकांना शिधापत्रिका व वितरणासंबंधी काही तक्रारी असल्यास उपरोक्त संकेतस्थळ, हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन नागरी पुरवठा संचालक कैलास पगारे यांनी केले आहे.

सर्व परप्रांतीय व स्थलांतरित मजूर पात्र लाभार्थ्यांना वन नेशन- वन रेशन कार्ड या योजनेंतर्गत पार्टेबिलिटीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याबाबतच्या तक्रारींकरिता हेल्पलाइन क्रमांक १४४४५, मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्राकरिता हेल्पलाइन क्रमांक ०२२ २२८५२८१४, तसेच ई-मेल क्रमांक dycor.ho-mum@gov.in उपलब्ध आहे, अशी माहिती देण्यात आली.