मध्य रेल्वेवर विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक, लोकल, लांब पल्ल्याच्या गाड्यांना फटका 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 11:36 AM2023-02-10T11:36:39+5:302023-02-10T11:37:09+5:30

याचा लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांना फटका बसणार आहे. 

Special traffic and power block on Central Railway, local, long distance trains affected | मध्य रेल्वेवर विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक, लोकल, लांब पल्ल्याच्या गाड्यांना फटका 

मध्य रेल्वेवर विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक, लोकल, लांब पल्ल्याच्या गाड्यांना फटका 

Next

मुंबई :  मध्य रेल्वेकडून टिटवाळा आणि आसनगावदरम्यान अप आणि डाऊन मार्गांवर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमधील बदलासाठी चाचणीकरिता ११ ते १३ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री २.०५ ते ५.३५ या कालावधीत रात्रकालीन विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्याचा लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांना फटका बसणार आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री १२.१५ वाजता सुटणारी कसारा उपनगरीय (लोकल) ठाणे येथे शॉर्ट टर्मिनेट होईल. कसारा येथून ३.५१ वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करिताची उपनगरीय (लोकल) ट्रेन ठाणे येथून चालेल. लांब पल्ल्याच्या गाड्या आसनगाव, आटगाव, खर्डी, कसारा येथे ३५ मिनिटे ते ९५ मिनिटांपर्यंत नियमित केल्या जातील आणि वेळेपेक्षा उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील. 

  यामध्ये गोरखपूर - लोकमान्य टिळक टर्मिनस सुपरफास्ट एक्स्प्रेस, आदिलाबाद-मुंबई एक्स्प्रेस, अमरावती - मुंबई एक्स्प्रेस गोंदिया - मुंबई एक्स्प्रेस, अमरावती - मुंबई एक्स्प्रेस, सिकंदराबाद- मुंबई एक्स्प्रेस, निजामुद्दीन- एर्नाकुलम, फिरोजपूर - मुंबई पंजाब मेल, नागपूर - मुंबई एक्स्प्रेस, शालीमार - मुंबई एक्स्प्रेस साईनगर शिर्डी - दादर एक्स्प्रेस, रक्सौल- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस या गाड्यांचा समावेश आहे.

Web Title: Special traffic and power block on Central Railway, local, long distance trains affected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.