‘मरे’वर आज विशेष वाहतूक ब्लॉक, रोहा यार्ड येथील ट्रॅक्शनचे काम, गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 08:45 AM2022-11-18T08:45:13+5:302022-11-18T08:45:38+5:30

Central Railway: मध्य रेल्वेच्या रोहा यार्ड येथील ट्रॅक्शन बदलासाठी शुक्रवारी, १८ नोव्हेंबरला विशेष वाहतूक ब्लॉक सकाळी १०:२० ते सायंकाळी ४:५५ वाजेपर्यंत असणार आहे.

Special traffic block on 'Central Railway' today, traction work at Roha yard, change in train schedule | ‘मरे’वर आज विशेष वाहतूक ब्लॉक, रोहा यार्ड येथील ट्रॅक्शनचे काम, गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

‘मरे’वर आज विशेष वाहतूक ब्लॉक, रोहा यार्ड येथील ट्रॅक्शनचे काम, गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

Next

मुंबई : मध्य रेल्वेच्या रोहा यार्ड येथील ट्रॅक्शन बदलासाठी शुक्रवारी, १८ नोव्हेंबरला विशेष वाहतूक ब्लॉक सकाळी १०:२० ते सायंकाळी ४:५५ वाजेपर्यंत असणार आहे. त्यामुळे पनवेल आणि रोहा मार्गे जाणाऱ्या आणि येणाऱ्या लांब पल्ल्याचा मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. 
मध्य रेल्वेच्या रोह्याच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या दिवा-रोहा मेमूला नागोठणे स्थानकांपर्यंत चालविण्यात येणार आहेत. रोहा-दिवा मेमू नागोठणेवरून सायंकाळी ४:३१ वाजता सुटणार आहे. रत्नागिरी-दिवा पॅसेंजर, मंगला लक्षद्वीप एक्स्प्रेस, गांधीधाम हमसफर एक्स्प्रेस आणि नेत्रावती एक्स्प्रेस आपल्या निर्धारित वेळेपेक्षा २० ते ३० मिनिटे उशिराने धावतील. सावंतवाडी-दिवा सिंधुदुर्ग एक्स्प्रेस रोहा, निडी, नागोठणे, कासू, पेण, हमरापूर, रसायनी व सोमाटणे स्थानकांवर थांबतील.

Web Title: Special traffic block on 'Central Railway' today, traction work at Roha yard, change in train schedule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.