Join us

३८५ श्रमिक विशेष ट्रेन : ५ लाखांहून अधिक मजूर मूळगावी पोहचले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 7:40 PM

मागील तेरा दिवसात पश्चिम रेल्वेने चालविल्या ३८५ श्रमिक विशेष ट्रेन : ५ लाखांहून अधिक मजूर पोहचले आपल्या मूळगावी

 

मुंबई : रेल्वे प्रशासनाच्यावतीने देशातील मजूर, कामगारांना त्यांच्या मूळगावी जाण्यासाठी 'श्रमिक विशेष ट्रेन' सुरु केली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरून मागील तेरा दिवसात पश्चिम रेल्वेने ३८५ श्रमिक विशेष ट्रेन चालविण्यात आल्या आहेत. या ट्रेनमधून ५ लाख १९ हजार १७७ मजुरांनी प्रवास केला आहे.

लॉकडाउनमध्ये देशात विविध ठिकाणी अडकलेल्या मजुरांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी भारतीय रेल्वे प्रशासनाकडून कामगार दिनी म्हणजे १ मे रोजीपासून श्रमिक विशेष ट्रेन चालविण्यात येत आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावरून २ मे पासून श्रमिक विशेष ट्रेन चालविण्यात आली. २ ते १४ मे याकालावधीत ३८५ श्रमिक विशेष ट्रेन चालविण्यात आल्या. यातून ५ लाख १९ हजार १७७ मजुरांनी प्रवास केला.  या मजुरांना त्यांच्या मूळगावी सोडण्यात आले.  प्रवासादरम्यान मजुरांना जेवण आणि पिण्याचे पाणी देण्यात येत आहे. सर्वाधिक ट्रेन या उत्तरप्रदेश, बिहार, राज्यस्थान या राज्यात गेल्या. 

पश्चिम रेल्वे मार्गावरून १४ मे रोजी बोरिवली ते गोरखपूर एक फेरी, वांद्रे टर्मिनस ते गोंडा एक फेरी, वांद्रे टर्मिनस ते गोरखपूर दोन फेऱ्या, वसई रोड ते जौनपूर एक फेरी, बोरिवली ते गोंडा एक फेरी, बोरिवली ते जौनपूर एक फेरी आणि वसई रोड ते शिखर एक फेरी चालविण्यात आली. 

टॅग्स :रेल्वेकोरोना सकारात्मक बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस