दिवाळी, छट पूजेकरिता मध्य रेल्वेच्या आजपासून धावणार विशेष गाड्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2021 10:17 AM2021-10-30T10:17:43+5:302021-10-30T10:33:13+5:30

Central Railway : बुकिंग ३० ऑक्टोबरपासून सुरू होणार असून,  फक्त कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी आहे. तसेच कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. 

Special trains of Central Railway will run from October 30 for Diwali and Chhat Puja | दिवाळी, छट पूजेकरिता मध्य रेल्वेच्या आजपासून धावणार विशेष गाड्या 

दिवाळी, छट पूजेकरिता मध्य रेल्वेच्या आजपासून धावणार विशेष गाड्या 

Next

मुंबई : दिवाळी आणि छट उत्सवाकरिता मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या धावणार आहेत. यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस - बरौनी विशेष आणि पुणे - पाटणा विशेष गाडीचा समावेश आहे. या गाड्यांसाठी विशेष शुल्क आकारले जाणार आहे. बुकिंग ३० ऑक्टोबरपासून सुरू होणार असून,  फक्त कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी आहे. तसेच कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. 

लोकमान्य टिळक टर्मिनस - बरौनी विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १५ नोव्हेंबर रोजी १२.१५ वाजता सुटेल आणि बरौनी येथे तिसऱ्या दिवशी ५ वाजता पोहोचेल.  तर विशेष गाडी  बरौनी येथून १३ नोव्हेंबर रोजी १६.३० वाजता  सुटेल आणि  लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसऱ्या दिवशी १० वाजता पोहोचेल. ही  गाडी कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंगपूर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी जंक्शन, वाराणसी, छपरा, हाजीपूर, मुझफ्फरपूर आणि समस्तीपूर  येथे थांबणार आहे. 

पुणे - पाटणा विशेष गाडी १४ नोव्हेंबर रोजी पुणे येथून ५.३० वाजता सुटेल आणि पाटणा येथे दुसऱ्या दिवशी १२ वाजता पोहोचेल.  तर  विशेष गाडी १२ नोव्हेंबर रोजी पाटणा येथून १०.४० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी १८.५० वाजता पोहोचेल. ही गाडी दौंड कॉर्डलाइन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, गाडरवारा, नरसिंगपूर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी जंक्शन, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर  आणि आरा येथे थांबणार
 आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस - बरौनी विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १५ नोव्हेंबर रोजी १२.१५ वाजता सुटेल आणि बरौनी येथे तिसऱ्या दिवशी ५ वाजता पोहोचेल.  तर विशेष गाडी  बरौनी येथून १३ नोव्हेंबर रोजी १६.३० वाजता  सुटेल आणि  लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसऱ्या दिवशी १० वाजता पोहोचेल. 

Read in English

Web Title: Special trains of Central Railway will run from October 30 for Diwali and Chhat Puja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.