मुंबई, पुण्याहून उत्तर प्रदेश, बिहारसाठी विशेष गाड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 07:35 AM2021-05-10T07:35:22+5:302021-05-10T07:35:51+5:30

आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी असून प्रवाशांना प्रवासादरम्यान कोरोनाशी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.

Special trains from Mumbai, Pune to Uttar Pradesh, Bihar | मुंबई, पुण्याहून उत्तर प्रदेश, बिहारसाठी विशेष गाड्या

मुंबई, पुण्याहून उत्तर प्रदेश, बिहारसाठी विशेष गाड्या

Next

मुंबई: प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेनेमुंबई-पुण्याहून गोरखपूर, दानापूर, दरभंगा, छपरा, मंडुवाडीह दरम्यान विशेष शुल्कासह पूर्णतः आरक्षित विशेष गाड्या, अतिजलद विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

केवळ आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी असून प्रवाशांना प्रवासादरम्यान कोरोनाशी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.

मध्य रेल्वेच्या घेतलेल्या  निर्णयानुसार, मुंबईहून मुंबई-गोरखपूर-मुंबई विशेष (१० फेऱ्या), मुंबई-दानापूर-दानापूर विशेष अतिजलद, मुंबई-दरभंगा-मुंबई विशेष (४ फेऱ्या), मुंबई- छपरा-मुंबई विशेष (२ फेऱ्या), दादर-मंडुवाडीह - दादर विशेष अतिजलद (६ फेऱ्या) या गाड्या चालवण्यात येतील, तर पुण्याहून पुणे-गोरखपूर-पुणे विशेष (१० फेऱ्या), पुणे-दानापूर-पुणे विशेष अतिजलद (६ फेऱ्या), पुणे-दरभंगा-पुणे विशेष (४ फेऱ्या), पुणे-भागलपूर - पुणे विशेष (२ फेऱ्या) या गाड्या चालवल्या जाणार आहेत.
 

Web Title: Special trains from Mumbai, Pune to Uttar Pradesh, Bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.