Join us

मुंबई ते सिकंदराबाददरम्यान विशेष गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : प्रवाशांच्या अतिरिक्त गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई-सिकंदराबाद आणि मुंबई/पुणे - हुजूरसाहिब नांदेडदरम्यान विशेष गाड्या चालविण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : प्रवाशांच्या अतिरिक्त गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई-सिकंदराबाद आणि मुंबई/पुणे - हुजूरसाहिब नांदेडदरम्यान विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत.

यामध्ये मुंबई-सिकंदराबाद दुरांतो विशेष (द्वि-साप्ताहिक) गाडी २७ जानेवारीपासून लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर बुधवारी आणि शनिवारी २३.०५ वाजता सुटेल; तर सिकंदराबाद येथून दुरांतो विशेष गाडी २६ जानेवारीपासून दर मंगळवारी आणि शुक्रवारी २३.०५ वाजता सुटेल. मुंबई-हुजूरसाहिब नांदेड विशेष (दैनिक) गाडी २७ जानेवारीपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दररोज ६.१५ वाजता सुटेल. हुजूर साहिब नांदेड येथून विशेष गाडी २६ जानेवारीपासून रोज १०.०५ वाजता सुटेल.

पुणे - हुजूर साहिब नांदेड सुपरफास्ट विशेष (द्वि-साप्ताहिक) गाडी २७ जानेवारीपासून पुणे येथून सोमवारी आणि बुधवारी २२ वाजता सुटेल. हुजूर साहिब नांदेड येथून विशेष गाडी २६ जानेवारीपासून दर मंगळवारी आणि रविवारी २१.३० वाजता सुटेल.

.........................................