श्वसन विकारावरील आजरासाठी 'जे जे रुग्ग्णालयात' विशेष कक्ष

By संतोष आंधळे | Published: November 8, 2023 06:51 PM2023-11-08T18:51:12+5:302023-11-08T18:55:16+5:30

जे जे रुग्णायात श्वासविकार आजरांसाठी बुधवारी बाह्य रुग्ण विभागात ( ओ पी डी ) स्वतंत्र कक्ष सुरु करण्यात आले आहे.

Special Ward at 'J.J Hospital' for Respiratory Disorders in mumbai | श्वसन विकारावरील आजरासाठी 'जे जे रुग्ग्णालयात' विशेष कक्ष

श्वसन विकारावरील आजरासाठी 'जे जे रुग्ग्णालयात' विशेष कक्ष

मुंबई :  गेल्या काही दिवसात मुंबई शहरात वाढलेल्या वायु प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाला आहे. विशेष करून लहान मुलांपासून ते अबालवृद्धांमध्ये श्वासविकारच्या व्याधींमध्ये वाढ झाली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने मार्गदर्शकतत्वे जाहीर केली आहेत. त्यानुसार जे जे रुग्णायात श्वासविकार आजरांसाठी  बुधवारी बाह्य रुग्ण विभागात ( ओ पी डी ) स्वतंत्र कक्ष सुरु करण्यात आले आहे. तसेच वेळप्रसंगी जर उपचारकरिता त्या रुग्णांना दाखल करण्याची वेळ आली तर त्यासाठी  विशेष कक्ष राखुन ठेवण्यात आला आहे. 

सध्या राज्यातील विविध शहरांत वायुप्रदूषणाने थैमान घातले आहे. अशुद्ध हवा घेत नागरिक दैनंदिन दिवस ढकलत आहेत. साधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान ऋतुबदलानंतर थंडी काही प्रमाणात सुरू होत असते. या थंड वातावरणात दमटपणा असल्यामुळे दरवर्षी या काळात श्वसनाचे विकार पाहायला मिळतात. मात्र, यंदा हवेतील प्रदूषणाने मोठी उंची गाठली आहे. शहरातील काही भागांतील हवा गुणवत्ता निर्देशांक पाहिला तर तो काही ठिकणी २०० तर काही ठिकाणी ३०० च्या पार गेला आहे. या अशा वातावरणात दीर्घ काळ राहिल्यास श्वासविकारच्या व्याधी सुरू होतात.

सार्वजनिक आरोग्य विभागाने दिवाळीपूर्वीच राज्यभरातील १७ प्रदूषित शहरांची यादी जाहीर केली आहे. तसेच यासंदर्भात महापालिका आणि जिल्हा परिषदांना मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार रुग्णालयांत येणाऱ्या श्वसनविकाराच्या रुग्णांवर लक्ष ठेवण्याचे आदेश रुग्णालयांना देण्यात आले आहेत. मुंबईतील जेजे तर महामुंबईतील बदलापूर, उल्हासनगर आणि वाशी येथील रुग्णालयांचा समावेश यात आहे.

जे जे रुग्णालयात काय ? 

- श्वसन विकार ग्रस्त रुग्णांना तातडीचे उपचार मिळावेत यासाठी औषवैद्यक शास्त्र विभागाच्या ओ पी डी मध्ये स्वतंत्र कक्ष, सकाळी ८ ते १२ .३० या वेळेत रुग्णांना या ठिकाणी उपचार देण्यात येतील . त्यानंतर अपघात विभागात रुग्णावर उपचार करण्यात येतील.  
- या ठिकाणी श्वसन विकार ग्रस्त रुग्णांना त्रास होत तातडीने उपचार दिले जातील त्यामध्ये नेब्युलायझेशन देण्यात येईल. 
- श्वसन विकार ग्रस्त रुग्णांची संख्या वाढल्यात त्यांना दाखल करण्याकरिता स्वतंत्र कक्ष राखून ठेवण्यात आला आहे. 
- स्वतंत्र श्वसन विकार कक्ष औषधवैद्यकशास्त्र विभाग आणि छाती व क्षयरोग विभाग हे संयुक्तरित्या चालविणार आहे.

Web Title: Special Ward at 'J.J Hospital' for Respiratory Disorders in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई