Join us

खोदकामामुळे पाणी तुंबल्यास मदतीसाठी विशेष कक्ष सुरू, महत्त्वाकांक्षी कामातील अडथळा टाळण्यासाठी उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2020 2:04 AM

प्रकल्पाच्या खोदकामामुळे अतिवृष्टीत मुंबईत आसपासच्या परिसरात पाणी साचल्यास मदतीसाठी प्रियदर्शनी उद्यान, अमरसन्स उद्यान आणि वरळी डेअरी येथे नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहे.

मुंबई : लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. विलंब टाळण्यासाठी पावसाळ्यातही या प्रकल्पाचे काम सुरू राहणार आहे. मात्र या प्रकल्पाच्या खोदकामामुळे अतिवृष्टीत मुंबईत आसपासच्या परिसरात पाणी साचल्यास मदतीसाठी प्रियदर्शनी उद्यान, अमरसन्स उद्यान आणि वरळी डेअरी येथे नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहे.या कक्षांना आपत्कालीन नियंत्रण कक्षाशी जोडले आहे. प्रिंन्सेस स्ट्रीट ते वांद्रे सी-लिंक या ९.९८ कि.मी.च्या कोस्टल रोडचे काम महापालिकेमार्फत केले जात आहे. मात्र पावसाळ्यात रस्त्याचे काम सुरू असताना कोणतीही समस्या येऊ नये यासाठी तीन नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. त्याचबरोबर पालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या ‘१९१६’ या दूरध्वनीवर तक्रार नोंदवावी किंवा त्याबाबतची माहिती द्यावी, असे आवाहन महापालिकेच्या सागरी किनारा रस्त्याचे प्रमुख अभियंता विजय निघोट यांनी केले आहे.येथे करा संपर्क... पॅकेज १ - अमरसन्स उद्यान नियंत्रण कक्ष - ०२२-२३६१-०२२१, राकेश सिंग सिसोदिया ९१६७०६११०६ आणि देवेंद्र प्रसाद व निवासी अभियंता राजेश जाधव यांच्याशी अनुक्रमे ९९६७०१४३६२ व ९७०२४६७५७५ या ठिकाणी संपर्क करता येईल. पॅकेज २ - वरळी डेअरी नियंत्रण कक्ष - ०२२-२४९००३५९. अविक पांजा व आजाद सिंग या अधिकाऱ्यांशी अनुक्रमे ८६५७५००९०० व ९८१९०२६५९५ या क्रमांकांवर तर प्रकल्प व्यवस्थापक स्वर्णेंदु सामंता व शशिकांत एस. व्ही. यांच्याशी अनुक्रमे ७०१६७६५०७६ आणि ९१३६९९३७०३ या क्रमांकावर संपर्क साधावा. पॅकेज ४- प्रियदर्शिनी उद्यान - ०२२झ्र२३६२-९४१०. संदीप सिंग व उत्पल दत्ता या अधिकाऱ्यांशी अनुक्रमे ९९५८८९९५०१ व ९९५८७९३०१२ या क्रमांकांवर संपर्क साधता येऊ शकेल. तसेच प्रकल्प व्यवस्थापक किम जँग याँग व निवासी अभियंता विजय जंगम यांच्याशी अनुक्रमे ७०४५९०१३६६ व ७०८५४९३६३८ या क्रमांकांवर संपर्क करावा.

टॅग्स :मुंबईमुंबई महानगरपालिका