मुंबईकरांच्या सेवेत उद्यापासून स्पीड बोट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 05:49 AM2019-01-31T05:49:53+5:302019-01-31T05:50:22+5:30

कमी वेळेत मिळेल जलद प्रवासाची सुविधा

Speed boat from tomorrow's service in Mumbai | मुंबईकरांच्या सेवेत उद्यापासून स्पीड बोट

मुंबईकरांच्या सेवेत उद्यापासून स्पीड बोट

Next

मुंबई : मुंबईकरांना जलमार्गाने जलद प्रवास करण्यासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने उबर कंपनीसोबत स्पीड बोट सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. १ फेब्रुवारीपासून ही सेवा सुरू होईल. गेट वे आॅफ इंडिया, एलिफंटा व मांडवा जेट्टी या ठिकाणांहून ही सेवा सुरू करण्यात येईल. ६ ते ८ आसनी व १० आसनी बोटींची सुविधा यामध्ये पुरविण्यात येईल.

मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम कुमार व उबरचे प्रभजीत सिंह या वेळी उपस्थित होते. भाटिया यांनी यामुळे मुंबईतील जलप्रवास अधिक सुखकर व जलद होईल, असा विश्वास व्यक्त केला. मुंबईला मेरीटाईम बोर्डाच्या सहकार्याने समुद्री प्रवास व पर्यटनाचे देशाचे केंद्र बनविण्याचे धेय्य आम्ही पूर्ण करू, असे ते म्हणाले. विक्रम कुमार यांनी यामुळे जलप्रवासाला अधिक चालना मिळेल, असा आशावाद व्यक्त केला. सिंह म्हणाले, या माध्यमातून शहरातील विस्तारित जलप्रवासाच्या विविध पर्यायांवर आम्ही विचार करू व चांगली परिणामकारक सेवा पुरवू. प्रवासी व बोट चालक दोन्ही घटकांना यामुळे लाभ होईल, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Speed boat from tomorrow's service in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.