Join us

डीसी-एसी परावर्तनाला गती

By admin | Published: December 12, 2014 12:50 AM

मध्य रेल्वेवर ठाणो ते सीएसटी सर्व मार्गावर डीसी ते एसी परावर्तनाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. आता त्याची पाहणी आणि मंजुरीची प्रतीक्षा मध्य रेल्वेला करावी लागणार आहे.

मुंबई : मध्य रेल्वेवर ठाणो ते सीएसटी सर्व मार्गावर डीसी ते एसी परावर्तनाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. आता त्याची पाहणी आणि मंजुरीची प्रतीक्षा मध्य रेल्वेला करावी लागणार आहे. सर्व कागदोपत्री कामांची पूर्तता करण्यासाठी आता मध्य रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी मुख्य रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवला आहे. 
पश्चिम रेल्वे मार्गावर 1,5क्क् करंट डीसी ते 25,क्क्क् करंट एसी परावर्तनाचे काम पूर्ण झाल्यानंतर मध्य रेल्वेवर हे काम पूर्ण झाले नव्हते. मध्य रेल्वेवरील कल्याणपुढे डाऊन दिशेला काम पूर्ण करताना कल्याण ते ठाणो संपूर्ण मार्गावर आणि ठाणो ते कल्याण पाचव्या-सहाव्या मार्गावर हे काम जानेवारी 2क्14र्पयत  पूर्ण करण्यात आले. अखेर शेवटच्या टप्प्यातील ठाणो ते सीएसटीर्पयत सर्व लोकल मार्गावर काम बाकी असून, ते कामही त्वरित हाती घेण्यात आले आणि जून महिन्यार्पयत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र जून, त्यानंतर ऑगस्ट, सप्टेंबर असे करीत हे काम नोव्हेंबर्पयत पूर्ण करण्यात आले. मात्र काम जरी पूर्ण करण्यात आले असले तरी रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या पाहणीशिवाय एसी परावर्तन सुरू करू शकत नाही. त्याचप्रमाणो नवीन गाडय़ा धावण्याचा मार्गही मोकळा होऊ शकत नाही. हे पाहता दोन आठवडय़ांपूर्वी मध्य रेल्वेकडून रेल्वे सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी यांच्याकडे प्रस्ताव पाठवला असून, यात परावर्तनाची सगळी माहिती देण्यात आली आहे. परावर्तनाची सगळी माहिती घेतल्यानंतर बक्षी यांनी एका आठवडय़ापूर्वी लखनौमध्ये असलेल्या मुख्य रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवला आहे. यात पाहणीसाठी आणि अन्य महत्त्वाची शेवटची कामे पार पाडण्यासाठी मंजुरी मागितली आहे. याबाबत रेल्वे सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी यांनी सांगितले की, ती मंजुरी आल्यानंतर डीसी-एसी परावर्तनाची पाहणी केली जाईल. तसेच चाचणीही घेतली जाईल आणि एक अहवाल बनविल्यानंतर त्याला मंजुरी दिली जाईल. त्यामुळे गाडय़ांचा वेग वाढण्याबरोबरच नवीन गाडय़ा धावण्याचा मार्गही मोकळा होईल. मुख्य सुरक्षा आयुक्तांकडून हा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडेही जाणार 
आहे. (प्रतिनिधी)
 
च्मध्य रेल्वेच्या ताफ्यात असलेल्या लोकल गाडय़ा आणि त्यांच्या फे:यांची गेल्या 1क् वर्षातील आकडेवारी पाहिली असता लोकल प्रवाशांच्या वाटय़ाला फारच कमी नवीन लोकल आल्या आहेत. 2004 साली मध्य रेल्वेकडे 93 नवीन लोकल होत्या. त्या वेळी 1 हजार 180 फे:या लोकलच्या होत होत्या. आता 2014 साली मध्य रेल्वेच्या ताफ्यात 121 नवीन लोकल असून, त्याच्या 1 हजार 618 फे:या होत आहेत. हे पाहता केवळ 28 नवीन लोकलची भर पडली आहे, तर 438 फे:या वाढलेल्या आहेत.