Join us

एक्स्प्रेस वेवरील वाहनांची वेगमर्यादा ताशी १०० किमी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 6:01 AM

एक्स्प्रेस वेवरील वाढत्या वेगामुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) एक्स्प्रेस वेवरील वेगमर्यादा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : एक्स्प्रेस वेवरील वाढत्या वेगामुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) एक्स्प्रेस वेवरील वेगमर्यादा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या या मार्गावर वेगमर्यादा ताशी १२० किमी इतकी आहे. ती १८ नोव्हेंबरपासून ताशी १०० किमी इतकी करण्यात येणार आहे.नवीन वेगमर्यादेसंदर्भात २५ आॅक्टोबरला अधिसूचना काढण्यात आली असून त्याची अंमलबजावणी १८ नोव्हेंबरपासून करण्यात येईल. तोपर्यंत वेगमर्यादेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. यासाठी एक्स्प्रेस वेसह महामार्गावर माहिती फलकही लावण्यात येणार आहेत. १८ नोव्हेंबरपासून प्र्रतितास १०० किमीपर्यंत वेगाने वाहन चालवणे बंधनकारक असून वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. यासाठी स्पीडगन आणि काही ठिकाणी उपलब्ध सीसीटीव्ही कॅमेºयांचा वापरही करण्यात येणार आहे.नियमाचे उल्लंघन केल्यास एक हजार रुपयांचा दंडकेंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या सूचनेनुसार एक्स्प्रेस वेवरील ताशी कमाल वेगमर्यादा ८० वरून १२० किमीपर्यंत करण्यास राज्य रस्ते विकास महामंडळाने जुलै महिन्यात परवानगी दिली होती. परंतु अतिवेगवान आणि बेशिस्तपणे गाडी चालकांमुळे एक्स्प्रेस वेवर अपघातांमध्ये वाढ झाली. यामुळे वेगमर्यादा कमी करण्याची मागणी करण्यात येत होती. महामार्ग पोलिसांकडून यासाठी प्रयत्न करण्यात आले. अखेर राज्य रस्ते विकास मंडळाने एक्स्प्रेस वेवरील वाहनांची वेगमर्यादा १२० ऐवजी १०० किमीपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या वेगमर्यादेचे उल्लंघन करणाºयांवर एक हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून १८ नोव्हेंबरपासून ही वेगमर्यादा लागू करण्यात येईल, अशी माहिती अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक) कार्यालयातील अधीक्षक विजय पाटील यांनी दिली.>वाहनांसाठी अशी असेल वेगमर्यादाअप्पर पोलीस महासंचालक कार्यालयाने निश्चित केलेल्या वेगमर्यादेनुसार एक्स्प्रेस वेवर चालकासह आठ प्रवासी क्षमतेची वाहने यांचा वेग ताशी १०० किमी, नऊपेक्षा अधिक क्षमतेची प्रवासी वाहने ८० किमी, मालवाहू वाहने ८० किमी इतकी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.राष्ट्रीय/राज्य महामार्ग (चार लेन) मार्गावर चालकासह आठ प्रवासी क्षमतेची वाहने ९० किमी, नऊपेक्षा अधिक प्रवासी क्षमतेची वाहने ८० किमी, मालवाहू वाहने ८० किमी, दुचाकी वाहने ७० किमी तर रिक्षा ६० किमीपर्यंत वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

टॅग्स :मुंबई-पुणे एक्सप्रेस वे