CoronaVirus News in Mumbai: मेट्रो २ बी मार्गिकेच्या कामाला गती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 12:58 AM2020-05-02T00:58:52+5:302020-05-02T00:59:01+5:30

डी.एन. नगर ते मंडाले दरम्यानच्या मेट्रो-२ बी मार्गिकेच्या कामालाही सुरुवात केली असून या कामाला गती आली आहे.

Speed up Metro 2B line work | CoronaVirus News in Mumbai: मेट्रो २ बी मार्गिकेच्या कामाला गती

CoronaVirus News in Mumbai: मेट्रो २ बी मार्गिकेच्या कामाला गती

Next

मुंबई : लॉकडाउनदरम्यान मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) विविध प्रकल्पांची कामे सुरू करण्यात आली आहेत. यामध्ये डी.एन. नगर ते मंडाले दरम्यानच्या मेट्रो-२ बी मार्गिकेच्या कामालाही सुरुवात केली असून या कामाला गती आली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने केंद्र सरकारने देशभरामध्ये लॉकडाउन घोषित करण्यात आला. या वेळी एमएमआरडीएच्या सुरू असलेल्या प्रकल्पांच्या कामाला अंशत: स्थगिती देण्यात आली होती. मात्र ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रभाव नसेल अशा भागांत काम करण्यास नंतर परवानगी देण्यात आली. यानंतर एमएमआरडीए प्राधिकरणाने सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळत प्रकल्पांची कामे सुरू केली. या वेळी डी.एन. नगर ते मंडालेदरम्यानच्या मेट्रो-२ बी मार्गिकेवर गर्डरच्या कामालाही सुरुवात करण्यात आली आहे. डी.एन. नगर ते मंडालेदरम्यान २३.६३ किमी उन्नत मार्गिका तयार होणार आहे. या संपूर्ण मार्गिकेदरम्यान एकूण २२ स्थानके असणार आहेत. जेव्हा लॉकडाउन सुरू झाले त्याचवेळी एमएमआरडीएने ११ हजार मजुरांच्या राहण्याची आणि खाण्याची सोय केली होती. त्यामुळे त्यांच्या स्थलांतरापासून त्यांना रोखण्यात यश आले होते. आता या मजुरांच्या साहाय्याने एमएमआरडीएने पुन्हा कामे सुरू केली असून, मान्सूनपूर्व कामांनाही सुरुवात केली आहे.
>१०,९८६ कोटींचा खर्च
मेट्रो-२ बी या संपूर्ण उन्नत मार्गिकेसाठी १०,९८६ कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. या मार्गिकेमध्ये इंटरचेंजची सुविधा उपलब्ध होणार आहे. ही मार्गिका डी.एन. नगरमध्ये घाटकोपर ते वर्सोवा या मेट्रो-१ मार्गिकेला जोडली जाणार आहे. तर बीकेसीमध्ये कुलाबा ते सीप्झदरम्यान होणाऱ्या मेट्रो-३ मार्गिकेला छेदणार आहे. तर चेंबूरमध्ये मोनोरेलला आणि पूर्व द्रुतगती महामार्गावर मेट्रो-४ मार्गिकेला जोडली जाणार आहे.

Web Title: Speed up Metro 2B line work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Metroमेट्रो