Join us

मध्य रेल्वेच्या २०० वर गाड्यांचा वेग ताशी १३०; महाराष्ट्रातील मेल- एक्स्प्रेसला फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 6:18 AM

‘या’ गाड्यांचा वेग वाढणार

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई  ( Marathi News ):  मध्य रेल्वेने आतापर्यंत १,२०६.७३ किलोमीटर रेल्वे मार्गाच्या सक्षमीकरण आणि पायाभूत सुविधा अद्ययावत केल्या आहेत. त्यामुळे मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत, मुंबई-सोलापूर वंदे भारत, मुंबई-नागपूर दुरांतो एक्स्प्रेस, सीएसएमटी हावडा एक्स्प्रेस, नंदीग्राम एक्स्प्रेस यासह दोनशेपेक्षा जास्त मेल- एक्स्प्रेस गाड्यांचा वेग ताशी  १३० पर्यंत पोहोचणार आहे. 

आता दौंड-सोलापूर-कलबुर्गी-वाडी विभागातील ३३७.४४ किलोमीटर रेल्वे मार्गाचे सक्षमीकरण करण्याचे काम सुरू आहे.  मध्य रेल्वेच्या झोनमध्ये  महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटक राज्यांमध्ये ४,१५१ किमी भाग येतो. विशेष म्हणजे आतापर्यंत मध्य रेल्वे मार्गावर १०० ते ११० किलोमीटर ताशी वेगाने गाड्या धावत होत्या. मात्र, गेल्या काही वर्षांपासून मध्य रेल्वने गाड्यांच्या वेग वाढविण्यासाठी रेल्वे मार्गाचे अद्ययावतीकरण करण्याचे काम सुरू केले असून सिग्नल यंत्रणाही सक्षम केली जात आहे. यामध्ये मल्टी ट्रॅकिंग, ओव्हर हेड इक्विपमेंट रेग्युलेशन, सिग्नलिंग कामे आणि इतर तांत्रिक कामे यांचा समावेश आहे. 

७५.५९ किलोमीटचा पुणे – दौंड विभाग, ५०९.०५ किलोमीटरचा इटारसी-नागपूर-वर्धा- बल्हारशाह विभाग, ९५.४४ किलोमीटरचा वर्धा-बडनेरा विभाग, ५२६.६५ किलोमीटरचा इगतपुरी- मनमाड - भुसावळ विभागाचा समावेश आहे. त्यामुळे दोनपेक्षा जास्त मेल- एक्स्प्रेस गाड्यांची गती १३० पर्यंत पोहोचली असून रेल्वे प्रवासाच्या वेळातही मोठी बचत झाली आहे.

प्रवास होणार गतिमान 

३३७.४४ किलोमीटर अंतराच्या दौंड-सोलापूर-कलबुर्गी-वाडी विभागात रेल्वे मार्गाच्या सक्षमीकरणाचे काम सुरू आहे. याशिवाय १७ किमीच्या पुणतांबा-शिर्डी विभागावर ७५ किमी प्रतितासवरून ११० किमी प्रतितास आणि ९ किमीच्या बडनेरा-अमरावती सेक्शनवर ताशी ६५ किमीवरून ९० किमी प्रतितास वेग वाढला आहे.

‘या’ गाड्यांचा वेग वाढणार  

मुंबई -साईनगर शिर्डी वंदे भारत मुंबई -सोलापूर वंदे भारत नागपूर दुरांतो एक्स्प्रेस सीएसएमटी - हावडा एक्स्प्रेस नंदीग्राम एक्स्प्रेस सिद्धेश्वर एक्स्प्रेस एलटीटी गोरखपूर एक्स्प्रेसएलटीटी - बिलासपूर एक्स्प्रेस विदर्भ एक्स्प्रेस प्रगती एक्स्प्रेस 

टॅग्स :मध्य रेल्वेवंदे भारत एक्सप्रेसभारतीय रेल्वे