रेल्वे प्रकल्पांना मिळणार गती

By admin | Published: February 24, 2016 02:03 AM2016-02-24T02:03:34+5:302016-02-24T02:03:34+5:30

मुंबई शहर आणि उपनगरात एमआरव्हीसीच्या (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) एमयुटीपीअंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांना गती देण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज आहे.

Speed ​​of railway projects will get | रेल्वे प्रकल्पांना मिळणार गती

रेल्वे प्रकल्पांना मिळणार गती

Next

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात एमआरव्हीसीच्या (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) एमयुटीपीअंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांना गती देण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज आहे. त्यासाठी एमआरव्हीसीने १ हजार ४३८ कोटी रुपये निधीच्या मंजुरीसाठी रेल्वे मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठविला आहे. त्याला रेल्वे अर्थसंकल्पात मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा एमआरव्हीसीच्या अधिकाऱ्यांनी बाळगली आहे. उपनगरीय लोकल मार्गावर एमयुटीपी-१ मधील रेल्वेचे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर एमयुटीपी-२ मधील प्रकल्पांना २00८-0९ मध्ये मंजुरी देण्यात आली. यामध्ये सीएसटी ते कुर्ला पाचवा-सहावा मार्ग, ठाणे ते दिवा-पाचवा सहावा मार्ग आणि हार्बरचा गोरेगावपर्यंत विस्तार या प्रमुख प्रकल्पांसह अन्य काही कामांचा समावेश आहे. साधारण पाच वर्षांत हे प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित असताना, ते बरेच रखडले आणि त्याचा खर्च वाढत गेला. ठाणे ते दिवा पाचवा-सहावा मार्ग आणि हार्बरचा गोरेगावपर्यंत विस्तार हे दोन प्रकल्प सोडल्यास सीएसटी ते कुर्ला पाचव्या-सहाव्या मार्गाचे काम अजूनही सुरू झालेले नाही. यातील परेल टर्मिनससारख्या प्रकल्पाला गती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे, यामधील हार्बरवरील बारा डबा प्रकल्प आणि डीसी-एसी परावर्तनही पूर्ण करण्यावर लक्ष देण्यात येत आहे. हे प्रकल्प सुरू असतानाच एमयुटीपी-३ मधील सहा प्रकल्पांची घोषणा करून मागील अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली. मात्र, यातील तीन प्रकल्पांनाच गती देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे एकूणच लागणारा निधी पाहता, एमआरव्हीसीकडून १ हजार ४३८ कोटी रुपयांच्या मंजुरीचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. (प्रतिनिधी) सध्या काही प्रकल्पांचे काम सुरू आहे आणि काहींना मंजुरी मिळाली आहे. यासाठी निधी लागणार असून, १,४३८ कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे नोव्हेंबर महिन्यातच पाठविण्यात आला आहे. यात राज्य सरकारचीही भागीदारी आहे, त्याला मंजुरी आवश्यक आहे. - प्रभात सहाय (एमआरव्हीसी- अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक)

Web Title: Speed ​​of railway projects will get

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.