लॉकडाऊन काळात रेल्वेच्या कामांना गती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 01:43 AM2020-08-17T01:43:42+5:302020-08-17T01:43:48+5:30

हा संपूर्ण मार्ग पूर्ण झाल्यावर मुंबई-उरणमधील अंतर जवळपास ४० ते ५० टक्के कमी होणार आहे.

Speed up railway works during lockdown | लॉकडाऊन काळात रेल्वेच्या कामांना गती

लॉकडाऊन काळात रेल्वेच्या कामांना गती

Next

मुंबई : लॉकडाऊन कालावधी दरम्यान मध्य रेल्वे अनेक पायाभूत सुविधा पूर्ण अथवा त्याची कामे वेगाने करत आहे. त्या प्रमुख पायाभूत कामांमध्ये २७ किमी काम आणि बेलापूर-सीवूड्स-उरण प्रकल्पातील उर्वरित १४.६० किमी लांबीचा खारकोपर-उरण मार्ग याच्या कामांना गती देण्यात येत आहे. हा संपूर्ण मार्ग पूर्ण झाल्यावर मुंबई-उरणमधील अंतर जवळपास ४० ते ५० टक्के कमी होणार आहे.
मध्य रेल्वे मुंबई उपनगरी नेटवर्कचा चौथा कॉरिडोर असलेला बेलापूर-सीवूड्स-उरण रेल्वेमार्ग, पूर्ण झाल्यामुळे मुंबई ते जेएनपीटी व उरण या प्रवाशांच्या प्रवासाची वेळ कमी होईल व नवी मुंबईत नवीन तयार होत असलेल्या विमानतळावर जाण्याची सोयही प्रवाशांना होणार आहे.
मध्य रेल्वेच्या निर्माण विभागाने या प्रकल्पाची गती वाढविल्यामुळे रेल्वेला मुंबई ते जवाहरलाल नेहरू बंदरातील हा महत्त्वपूर्ण प्रवेश योग्य रेल्वेमार्ग पूर्ण करता येणार आहे.
खारकोपर-उरण नवीन मार्ग बांधण्याचे काम बांधकाम यंत्रणेच्या साहाय्याने चालू आहे. जसे की, पाइल्स बोरींग मशीन, काँक्रिट प्लेसर बूम, ट्रान्झिट मिक्सर, ट्रिपर्स, जेसीबी, हायड्रस, पोकलेन्स, हायड्रॉलिक जॅक्स इत्यादींसह मुख्य बांधकाम उपक्रम सुरू आहेत. प्रगती पुढीलप्रमाणे - रांजनपाडा स्टेशनवरील कव्हर ओव्हर प्लॅटफॉर्मचे सुपरस्ट्रक्चरचे काम, न्हावा-शेवा, द्रोणागिरी व उरण स्थानकांवर पाया व उपरचना काम, उरण येथील सबवे काम, चैनेज १०९७५ येथे पूल फाउंडेशनचे काम, स्ट्रेसिंग आणि ७९८२ पुलावरील यू-गर्डर खाली करण्यात आली आहेत.
>कामगारांची सुरक्षा आणि आरोग्याची खबरदारी
खारकोपर-उरण दरम्यान ५ स्टेशन, २ मोठे पूल, ४१ छोटे पूल, २ रोड अंडरब्रिज आणि ४ रोड ओव्हरब्रिज आहेत. उपलब्ध कामगारांची
सुरक्षा आणि आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी सर्व खबरदारी घेण्यात आल्या आहेत.
लॉकडाऊन दरम्यान राबविण्यात आलेली कामे आणि पावसाळ्यातील पावसाच्या विश्रांतीमुळे लॉकडाऊनमधील बांधकाम कामकाजासाठी झालेला अपव्यय निश्चितपणे भरून काढणे शक्य होईल. चेनॅज ८ किमी ते चैनज ११ किमी दरम्यान ४.४७९ हेक्टर जमिनीची व्यवस्था (बहुतेक वनजमिनी) सिडकोकडून अद्याप करवून द्यायची बाकी आहे.

Web Title: Speed up railway works during lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.