खडकवासल्यातील रस्त्यांची कामे गतीने पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:14 AM2021-01-13T04:14:19+5:302021-01-13T04:14:19+5:30

- राज्यमंत्री दत्तात्रय भरणे लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : खडकवासला (जि. पुणे) येथील रस्त्यांची कामे कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे ...

Speed up road works on rocky outcrops | खडकवासल्यातील रस्त्यांची कामे गतीने पूर्ण करा

खडकवासल्यातील रस्त्यांची कामे गतीने पूर्ण करा

Next

- राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : खडकवासला (जि. पुणे) येथील रस्त्यांची कामे कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे लागू असलेल्या लॉकडाऊन काळात प्रभावित झाली. आता ही कामे ८० टक्क्यांपर्यंत पूर्ण झाली असून, उर्वरित कामे लवकर पूर्ण करावीत. कामे सुरू असताना वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी बॅरिकेटस‌् लावणे, पर्यायी रस्त्याने वाहतूक वळविणे आदी उपाययोजनांद्वारे सुरक्षितरित्या वाहतुकीचे नियमन करावे, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

‘खडकवासला येथील रस्त्यांची कामे सुरू असल्याने होणारी वाहतूक कोंडी दूर करणे’ या अनुषंगाने राज्यमंत्री श्री. भरणे यांच्या उपस्थितीत त्यांच्या मंत्रालयातील दालनात बैठक झाली. बैठकीस आमदार भीमराव तापकीर, उपसचिव (रस्ते) बी. एस. पांढरे, सार्वजनिक बांधकाम मंडळ, पुणेचे अधीक्षक अभियंता अ. भी. चव्हाण, सहायक अभियंता व्ही. एस. भुजबळ तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

हायब्रीड ॲन्युईटीअंतर्गत सुरू असलेल्या मावळ तालुक्यातील पौड-कोळवण-लोणावळा रस्ता सुधारणा, शिळींब मोरवे घुसळखांब ते राज्य महामार्ग-२१० ला मिळणाऱ्या रस्त्याची सुधारणा करणे तसेच वेल्हे तालुक्यातील खडकवासला-डोणजे-खानापूर-रांजणे पाबे ते राज्य महामार्ग-१०६ रस्त्याची सुधारणा करणे, या कामांच्या प्रगतीचा आढावा बैठकीत घेण्यात आला.

या प्रकल्पातील रस्त्यांची कामे सुरू असताना, प्रारंभी झाडे तोडण्यासाठी परवानगी, विजेच्या खांबांचे स्थलांतर आदीबाबतच्या अडचणी होत्या. तसेच रस्त्याची काही लांबी वन हद्दीत असल्याने वनविभागाची परवानगी तसेच नंतरच्या काळात कोविड परिस्थितीमुळे ६ महिने बंद होते.

Web Title: Speed up road works on rocky outcrops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.