Join us

आधार केंद्रे स्थापण्याच्या कामाला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 2:23 AM

मध्यंतरी आधार कार्ड बनविण्याच्या केंद्रांची कमतरता असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.

खलील गिरकर ।मुंबई : पोस्ट कार्यालयांत आधार केंद्रे स्थापन करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, येत्या आठवड्याभरात महाराष्ट्र व गोवा सर्कलमधील १ हजार २९३ पोस्ट कार्यालयांत आधार केंद्रे स्थापन करण्याचे काम पूर्ण होईल. महाराष्ट्र व गोवामधील १,२९३ पोस्ट कार्यालयांत आधार केंद्रे उभारण्यात येत असून, त्यापैकी १,१२३ ठिकाणी आधार केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. उर्वरित १७० केंद्रे आठवडाभरात कार्यान्वित होणार आहेत. ही सर्व केंद्रे सुरू झाल्यानंतर नागरिकांना त्याचा चांगला लाभ होईल.मुंबईत १९८ पोस्ट कार्यालयांत आधार केंद्रे स्थापन करण्यात येणार होती; त्यापैकी अवघी ३ केंद्रे सुरू करण्याचे शिल्लक आहे. नवी मुंबईतील ११, औरंगाबादमधील ५, पुण्यातील २०, गोव्यातील ४० व नागपूरमधील ९१ अशा एकूण १७० आधार केंद्रांची उभारणी शिल्लक आहे.मध्यंतरी आधार कार्ड बनविण्याच्या केंद्रांची कमतरता असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. आधारसाठी जमा करण्यात येणारी माहिती गोपनीय व महत्त्वपूर्ण असल्याने केवळ बँका व पोस्ट कार्यालयांमध्ये आधार केंद्रे स्थापण्याचा निर्णय केंद्र सरकारने आॅक्टोबर २०१७मध्ये घेतला होता. खासगी व्यक्ती व संघटनांद्वारे चालविण्यात येणारी सर्व केंद्रे बंद करून केवळ बँका व पोस्ट कार्यालयांत आधार केंद्रे चालविण्याचा निर्णय केंद्र सरकारने आॅक्टोबर २०१७मध्ये घेतला होता. त्याचाच एक भाग म्हणून पोस्टाच्या कार्यालयांमध्ये आधार केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. आधार केंद्रे सुरू करण्यापूर्वी युनिक आयडेंटिफिकेशन अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया (यूआयडी)तर्फे पोस्टाच्या कर्मचाऱ्यांची परीक्षा घेण्यात आली होती. त्यामध्ये उत्तीर्ण झालेल्या कर्मचाºयांना यूआयडीतर्फे प्रमाणपत्र देण्यात आले. त्या कर्मचाºयांच्या माध्यमातून नागरिकांना आधार कार्ड बनवून देण्यात येणार आहे. या केंद्रांमध्ये नवीन आधार कार्ड बनविणे, बदल करणे अशी कामे केली जाणार आहेत.राज्यातील एकूण १ हजार२९३ केंद्रांपैकी पुणे विभागात२४८ केंद्रे, नागपूर विभागात २४९केंद्रे, औरंगाबाद विभागात १५२केंद्रे, मुंबई विभागात १९८ केंद्रे, नवी मुंबईत १९७ केंद्रे व गोवामध्ये २४९ केंद्रे उभारण्यात येत आहेत.आता सर्व अडचणी दूरपोस्ट कार्यालयांत आधार केंद्रे स्थापन करण्याचे काम जवळपास पूर्णत्वास गेले असून, उर्वरित केंद्रे आठवडाभरात सुरू करण्याचे काम वेगाने सुरू आहे. काही ठिकाणी तांत्रिक अडचणींमुळे काम रखडले होते, मात्र आता सर्व अडचणी दूर करण्यात आल्या असून, काम लवकरच पूर्ण होणार असल्याचे महाराष्ट्र व गोवा सर्कल मुख्य पोस्ट मास्टर जनरल एच.सी. अग्रवाल यांनी सांगितले.

टॅग्स :आधार कार्ड