मेट्रो-६ आणि मेट्रो-४ मार्गिकांच्या कामांना वेग  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 04:42 AM2020-05-10T04:42:11+5:302020-05-10T04:42:34+5:30

मेट्रो-४ आणि मेट्रो-६ या मार्गिकांच्या कामांनाही आता गती आली आहे. हे मेट्रो प्रकल्प वेळेमध्ये पूर्ण करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन एमएमआरडीएने या कामांना वेग दिला आहे.

Speed up work on Metro-6 and Metro-4 corridors | मेट्रो-६ आणि मेट्रो-४ मार्गिकांच्या कामांना वेग  

मेट्रो-६ आणि मेट्रो-४ मार्गिकांच्या कामांना वेग  

Next

मुंबई : लॉकडाउन दरम्यान मुंबई महानगरप्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) विविध प्रकल्पांच्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे. या प्रकल्पांतील मेट्रो-४ आणि मेट्रो-६ या मार्गिकांच्या कामांनाही आता गती आली आहे. हे मेट्रो प्रकल्प वेळेमध्ये पूर्ण करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन एमएमआरडीएने या कामांना वेग दिला आहे. एमएमआरडीएने स्वामी समर्थ ते विक्रोळी या मेट्रो-६ मार्गिकेवर पवई आणि महाकाली येथे रिइन्फोर्समेंट वर्क सुरू आहे. यासह वडाळा-घाटकोपर-ठाणे कासारवडवली मेट्रो-४ मार्गिकेवरही गर्डर टाकण्याचे काम सुरू करण्यात येत आहे. या
दोन्ही मर्गिकांच्या कामांना वेग आला आहे.

यासह डीएन नगर ते मंडाले दरम्यानच्या मेट्रो-२ बी मार्गिकेवर गर्डरच्या कामालाही सुरुवात करण्यात आली आहे, तर दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व या मेट्रो-७ मार्गिकेच्या कामालाही वेग आला आहे. यासह या मार्गिकेवरील स्थानकांमध्ये बसवण्यात येणाऱ्या एक्सलेटरपैकी १२ एक्सलेटर नुकतेच आणण्यात आले असून दोन लिफ्ट आणण्यात आल्या आहेत. आता हे बसवण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. यासह इतर मेट्रो मार्गिकांच्या कामांनाही वेग आला आहे.

वडाळा-घाटकोपर-ठाणे कासारवडवली मेट्रो-४ मार्गिकेवरही गर्डर टाकण्याचे काम सुरू करण्यात येत आहे. या दोन्ही मर्गिकांच्या कामांना वेग आला आहे. लवकरच मुंबईकरांना याचा लाभ मिळेल़

Web Title: Speed up work on Metro-6 and Metro-4 corridors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.