मकर संक्रांतीमुळे तिळाचा भाव वधारला
By Admin | Published: January 13, 2015 10:16 PM2015-01-13T22:16:14+5:302015-01-13T22:16:14+5:30
राज्यात गारपीट आणि अवकाळी पाऊस यामुळे तेलबिया लागवडीच्या क्षेत्रात सातत्याने घट झाली आहे.
बोर्ली-मांडला : राज्यात गारपीट आणि अवकाळी पाऊस यामुळे तेलबिया लागवडीच्या क्षेत्रात सातत्याने घट झाली आहे. त्याचा फटका तिळाचे पीक घेणा-या शेतकऱ्यांना बसला आहे. तेलबियांना सातत्याने मिळत असलेल्या कमी भावामुळे यंदा राज्यात तीळक्षेत्रही खाली घसरल्याने बाजारपेठेत तिळाची आवक यंदा कमी झाली आहे. यामुळे तिळाचा भाव वधारला असून गतवर्र्षीच्या तुलनेत तिळाच्या विक्रीत ४० टक्के एवढी वाढ झाली आहे.
मकर संक्रांतीला तिळाला सर्वाधिक मागणी असल्यामुळे या तिळाचा दर हा रु. १३० ते १७० पर्यंत पोहचला आहे. संपूर्ण राज्यात तिळाचे उत्पादन कमी असल्याने आंध्र आणि कर्नाटकमधून तीळ मागवित असल्याचे देखील काही व्यापारी यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले. यावर्षी राज्यात झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी तिळाची लागवडच केली नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना फटका बसला आहे.