CoronaVirus: खबरदार! राज्यात सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, धूम्रपान केल्यास दंडासह शिक्षा ठोठावली जाणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 04:46 PM2020-05-30T16:46:28+5:302020-05-30T16:58:37+5:30
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास बंदी घालण्यात आली आहे.
मुंबई : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्यात सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, सुपारी, पान, पानमसाला, गुटखा तसेच अन्य तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन, थुंकण्यास व धूम्रपानास प्रतिबंध करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना दंडासह शिक्षा ठोठावण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले. देशात आणि राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. याला प्रतिबंध लावण्यासाठी शासन आणि प्रशासनातर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास बंदी घालण्यात आली आहे.
रस्ते, बाजार रुग्णालय व कार्यालय इत्यादी ठिकाणी थुंकल्यास मोठा दंड आकारण्यात येऊ शकतो. दुसऱ्यांदा आढळून आल्यास त्या व्यक्तीवर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत दिले आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास बंदी घातली आहे. तसेच चेह-यावर कायम मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे, किराणा व जीवनावश्यक वस्तू विक्रेत्याला वस्तूंचे दरपत्रक लावणे बंधनकारक केले असून मॉर्निंग वॉक, इव्हिनिंग वॉक व विनाकारण घराबाहेर फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहे. नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र यानंतरही मॉर्निंग आणि इव्हिनिंग वॉक करण्याच्या नावावर घराबाहेर पडत आहे. त्यामुळे प्रशासनानंही कडक धोरण अवलंबलं आहे.
हेही वाचा!
जैन समाजाच्या साधू-साध्वींना प्रवास करण्यास सरकारची परवानगी, पण 'हे' नियम पाळावे लागणार
CoronaVirus: अनर्थ टळला! एअर इंडियाचं विमान आकाशात असतानाच वैमानिक पॉझिटिव्ह निघाला अन्...