कर्जमाफीला फ्लॉप ठरविणारे प्रवक्तेच फ्लॉप - भाजपचा पलटवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 06:25 AM2019-09-21T06:25:32+5:302019-09-21T06:25:34+5:30

८९ लाखांपैकी पन्नास टक्के शेतकऱ्यांनाच कर्जमाफी मिळाल्याचा काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा दावा म्हणजे फ्लॉप प्रवक्त्यांचा फ्लॉप आरोप आहे,

Spokesperson Flop - BJP's commentry on congress | कर्जमाफीला फ्लॉप ठरविणारे प्रवक्तेच फ्लॉप - भाजपचा पलटवार

कर्जमाफीला फ्लॉप ठरविणारे प्रवक्तेच फ्लॉप - भाजपचा पलटवार

Next

मुंबई : ८९ लाखांपैकी पन्नास टक्के शेतकऱ्यांनाच कर्जमाफी मिळाल्याचा काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा दावा म्हणजे फ्लॉप प्रवक्त्यांचा फ्लॉप आरोप आहे, असा पलटवार भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला. पाच वर्षांत काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून एकही प्रभावी आरोप सावंतांना करता आलेला नाही, त्यामुळे नैराश्येतून अशी टीका त्यांच्या हातून होत असल्याचेही उपाध्ये म्हणाले. मुळात ८९ लाख शेतकऱ्यांचा आकडा कुठून आला, हे सचिन सावंतांनी समजून घेतले पाहिजे. शेतकरी खात्यांची ही संख्या राज्यस्तरीय बँकर्स समितीने दिलेली होती. त्यामुळे ती संख्या गृहीत धरण्यात आली. त्यानंतर जेव्हा आॅनलाइन अर्ज मागविण्यात आले, तेव्हा बँकांनीच सुमारे १५ लाख खाती बाद केली. काँग्रेसचे सरकार असते, तर बँकांच्या घशात रक्कम टाकून ते मोकळे झाले असते. पण, भाजप सरकारने तसे केले नाही. खºया गरजू शेतकºयांनाच लाभ मिळेल, हे सुनिश्चित केले. कारण, हा पैसा जनतेचा आहे. याशिवाय, शासकीय कर्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, आमदार, खासदार इत्यादी वर्गवारींना यातून वगळण्याचा निर्णय घेतला. त्यांचीही खाती या ८९ लाखांमध्ये होती. त्यामुळे पात्र सर्व शेतकºयांना लाभ देण्यात आला आहे. याशिवाय, पात्र अखेरच्या शेतकºयाला लाभ देता यावा, यासाठी ही योजना सुरूच ठेवण्यात आली आहे. इतक्या गतीने शेतकºयांच्या खात्यात पैसा जमा करणे आणि शिवाय, पुढेही संधी देत राहणे, हे केवळ भाजप सरकारमुळेच शक्य झाले, असेही केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे.

Web Title: Spokesperson Flop - BJP's commentry on congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.