मुंबई : जोगेश्वरी पूर्व येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, श्यामनगर येथील श्यामनगरचा राजा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात महिलांचा व तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. लोकमतचे संस्थापक जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त रक्तदानाचा महायज्ञ सुरू आहे. रक्तदान शिबिरात २७ रक्तदात्यांनी रक्तदान केले, त्यात ८ महिलांचा समावेश होता.
येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष दशरथ मोरे यांनी मंडपात आगामी सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त श्री गणरायाचे पाद्यपूजन केल्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता येथील रक्तदानाला सुरुवात झाली. कांता कांबळे या तरुणीने प्रथम रक्तदान करून येथील रक्तदान शिबिराचा शुभारंभ केला. या वेळी आतापर्यंत ८९ वेळा रक्तदान केलेल्या गजानन नार्वेकर आणि आतापर्यंत २४ वेळा रक्तदान करणाऱ्या धर्माजी वंजारे, १२९ वेळा रक्तदान करणारे घाटकोपरचे सुरेश रेवणकर यांचा या वेळी दशरथ मोरे यांनी खास सत्कार केला.
रक्तदान शिबिर पार पडण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष दशरथ मोरे, उपाध्यक्ष नरेश परब, विजय वंजारे, स्मिता सावंत, वैशाली भिंगार्डे, खजिनदार रमेश पाटील, सरचिटणीस सुदेश धुरी, उपसरचिटणीस विशाल सावंत, रूपल खैरनार, मेघा चव्हाण, स्मिता जाधव, अविनाश कदम, प्रकाश महाजन, उत्सव समिती अध्यक्ष शिवाजी खैरनार आणि त्यांचे सहकारी, मंडळाचे माजी अध्यक्ष व प्रमुख सल्लागार दत्ता पेडणेकर यांनी मेहनत घेतली.
फोटो ओळ
सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंंडळ श्यामनगरचा राजा आणि लोकमत आयोजित रक्तदान शिबिराला महिलांचा व तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. फोटोत डावीकडून विजय वंजारे, शिवाजी खैरनार, स्मिता सावंत, प्राजक्ता महाजन, रूपल खैरनार, वीणा सावंत, दत्ता सरदेसाई, रक्तदात्या पूजा दळवी, दशरथ मोरे (अध्यक्ष), स्मिता भिंगार्डे, ज्योती आळवे, स्मिता जाधव आदी.