मुंबई : ‘लोकमत’च्या रक्तदान महायज्ञास रविवारी जुहू येथेही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रोटरॅक्ट क्लब ऑफ मुंबई ज्वेल्स आणि सुजन सेवा मंडळ यांच्या सहकार्याने राऊत गल्ली जुहू-तारा येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले.
कोरोनाकाळात राज्यात ठिकठिकाणी रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. ही बाब लक्षात घेऊन ‘लोकमत’ने ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त २ ते १५ जुलै या कालावधीत ‘रक्ताचं नातं’ हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार, रविवारी जुहू तारा येथे रक्तदान शिबिर पार पडले. यावेळी २८ युनिट रक्तसंकलन करण्यात आले. महात्मा गांधी ब्लड सेंटरने या उपक्रमास सहकार्य केले.
या कार्यक्रमास मुंबई पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र (बाळा) आंबेरकर, माजी शाखा प्रमुख अनिल राऊत, निलेश राऊत, जयवंत राऊत, सुमित गुप्ते, आकाश ठाकूर आदी उपस्थित होते. तर रोटरॅक्ट क्लबतर्फे पश्चिम विभागीय अध्यक्ष हृतिक लोढा, सचिव मानव कोटक, ध्रुवी सतीया, यशस्वी दोशी, सिंधुजा त्रिपाठी, याज्ञिक मॅनिया, यशवर्धन, के. प्रेरणा राज, जयानी गुप्ता, परम पारीख यांनी सहभाग घेतला.
यावेळी बोलताना देवेंद्र आंबेरकर म्हणाले, राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना रक्तदानाचे आवाहन केले आहे. त्या अनुषंगाने ‘लोकमत’ने उचललेले पाऊल स्तुत्य आहे. स्वातंत्र्यसेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा यांना या निमित्ताने आदरांजली वाहण्याची संधी आम्हाला मिळाली. त्यासाठी सुजन सेवा मंडळ आणि रोटरॅक्ट क्लबचे आभार.
.......
राज्यावरील रक्त संकट दूर करण्यासाठी आम्हाला खारीचा वाटा उचलता आला याचे समाधान आहे. ‘लोकमत’ आणि रोटरॅक्ट क्लबच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले. सर्व रक्तदात्यांचे आभार.
- सुमित गुप्ते, सुजन सेवा मंडळ
..........
फोटो ओळ - लोकमतच्या रक्तदान महायज्ञास शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित देवेंद्र आंबेरकर यांच्या समवेत (डावीकडून) सिंधुजा त्रिपाठी, प्रेरणा राज, जयवंत राऊत, सुमित गुप्ते, अनिल राऊत, निलेश राऊत, यशस्वी दोषी, आकाश ठाकूर, ऋत्विक लोढा, करण पारीख.