Join us

‘लोकमत’च्या महारक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 4:06 AM

मुंबई : कोरोनामुळे राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आला आहे. त्यातच कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत रुग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा ...

मुंबई : कोरोनामुळे राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आला आहे. त्यातच कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत रुग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवला. यासाठी सरकारच्या वतीने समाजात रक्तदान शिबिरांची गरज बोलून दाखविली गेली होती. हेच लक्षात घेत राज्यात भासत असलेला रक्ताचा तुटवडा भरून निघावा तसेच गरजू रुग्णांना वेळेवर रक्त मिळावे यासाठी ‘लोकमत’च्या वतीने १ जुलै ते १६ जुलै या कालावधीत राज्यभरात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकमतच्या वतीने ‘नातं रक्ताचं - नातं जिव्हाळ्याचं’ या मोहिमेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या रक्तदान शिबिरांत नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त या रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. येत्या काळात रक्ताअभावी कोणत्याही रुग्णाला अडचण येऊ नये यासाठी राज्याकडे जास्तीतजास्त रक्तसाठा असणे गरजेचे आहे. यासाठी या रक्तदान शिबिरांत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.

रक्तदान शिबिरांची ठिकाणे

तारीख /उपनगर/ सहयोगी संस्था / पत्ता / वेळ

१० जुलै - जोगेश्वरी पूर्व : दशरथ गुरुनाथ मोरे, अध्यक्ष श्यामनगरचा राजा व्यासपीठ, सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ, श्यामनगर / श्यामनगरचा राजा व्यासपीठ, जोगेश्वरी पूर्व / सायंकाळी ५.३०

१० जुलै - दहिसर पूर्व : आर सी ठाकूर कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग / गुरुकुल फन झोन, गरिमा सदन, आशिष कॉम्प्लेक्स, दहिसर पूर्व / सकाळी ११ ते दुपारी ४

१० जुलै - खारघर : श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स, सेक्टर ३३ प्लॉट नंबर १, उत्सव चौक - सीआयएसएफ रोड, खारघर नवी मुंबई / स. ९ ते दु. १

-----------------

११ जुलै - सानपाडा : विजय नाहटा (शिवसेना नवी मुंबई) / चंदन बँक्वेट हॉल, पाम बीच मार्ग सानपाडा नवी मुंबई / १० ते ४

११ जुलै - कळंबोली : रामदास शेवाळे प्रतिष्ठान (कळंबोली-पनवेल-शिवसेना) / सुधागड स्कूल कळंबोली / ९ ते ४

११ जुलै - ठाणे पश्चिम : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, ओवळा माजिवडा विधानसभा / आर जे ठाकूर कॉलेज लोकमान्य नगर, ठाणे पश्चिम /१० ते ४

११ जुलै - डोंबिवली पूर्व : राजेश मोरे (शिवसेना शहर प्रमुख डोंबिवली) / शिवसेना मध्यवर्ती शाखा डोंबिवली पूर्व / १० ते ४

११ जुलै - भांडुप पश्चिम : राजन दादा गावडे आणि मित्रपरिवार रॉयल महाराष्ट्र युथ फाउंडेशन / गणेश नगर, गणेश मंदिराजवळ, नवरंग स्टोर, भांडुप पश्चिम / ९ते ४

११ जुलै - मुलुंड पूर्व : चेतन साळवी अध्यक्ष मुलुंड जिमखाना / मुलुंड जिमखाना नवघर रोड, शहानी कॉलनीसमोर, दीनदयाळ नगर, मुलुंड पूर्व / ८ ते ४

११ जुलै - घाटकोपर पूर्व : गंधकुटी संकल्प समिती / गंध कुटीर विहार माता रमाबाई आंबेडकर नगर, घाटकोपर पूर्व / १० ते ४

११ जुलै - बोरीवली पूर्व : संजय मोदी, हेल्पिंग हॅण्ड्स अँड असोसिएशन विथ समर्पण ब्लड बँक / इम्प्रिंट कन्स्ट्रक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड, सेंट जॉन हायस्कूलसमोर, सिद्धार्थनगर लेन, पश्चिम द्रुतगती महामार्ग, बोरीवली पूर्व / १० ते ४

११ जुलै - दादर पूर्व : संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन / संत निरंकारी सत्संग भवन, ५० मोरबाग रोड, नायगाव - दादर पूर्व / ९ ते १

११ जुलै - गिरगाव : श्रीकांत तेंडुलकर - अध्यक्ष, संजय हरमळकर - सचिव, गिरगावचा राजा गणेशोत्सव मंडळ / सारस्वत समाज हॉल, गिरगाव / १० ते ४

११ जुलै - बोरीवली पश्चिम : आम्ही मावळे / प्रगती स्कूल गोराई, बोरीवली पश्चिम / ९ ते ४

११ जुलै - अंधेरी पश्चिम : रोटरॅक्ट क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्ट / वाय एम सी ए न्यू लिंक रोड पोस्ट ऑफिससमोर, मधुबन कॉलनी, डी. एन. नगर, अंधेरी पश्चिम / ८.३० ते ३

११ जुलै - जुहू : रोटरॅक्ट क्लब ऑफ मुंबई ज्वेल्स / राऊत गल्ली जुहू तारा, जुहू / १० ते २

११ जुलै - मालाड पूर्व : रोटरॅक्ट क्लब ऑफ बॉम्बे नॉर्थ वेस्ट मालाड, रोटरॅक्ट क्लब ऑफ दहिसर कोस्ट, रोटरॅक्ट क्लब ऑफ घनश्यामदास सराफ कॉलेज / नवजीवन ज्युनिअर कॉलेज, मालाड मतनपूर नगर, मालाड पूर्व / ११ ते ४

११ जुलै - नालासोपारा पूर्व : नीलेश देशमुख, बहुजन विकास आघाडी / के एम पी डी स्कूल, तुळींज रोड, नालासोपारा पूर्व / ९ ते ५

११ जुलै - नालासोपारा पश्चिम : प्रवीण उमरकर, बहुजन विकास आघाडी / मदर मेरी स्कूल, शांती पार्क, श्रीप्रस्थ, दुसरा रोड, नालासोपारा पश्चिम / ९ ते ५

११ जुलै - बोईसर : रोटरी क्लब ऑफ बोईसर - तारापूर / श्रीराम मंदिर, नवापूर रोड, बोईसर / १० ते ३

११ जुलै - ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना (ओवळा माजिवडा विधानसभा) ठाणे / रा.ज. ठाकूर विद्या मंदिर हॉल, लोकमान्य नगर, पाडा नंबर , ठाणे पश्चिम / १० ते ४

११ जुलै - डोंबिवली : खासदार श्रीकांत शिंदे आणि राजेश गोवर्धन मोरे, शिवसेना मध्यवर्ती शहर शाखा डोंबिवली (शहर प्रमुख) / शिवसेना मध्यवर्ती शहर शाखा, डोंबिवली पूर्व / ९.३० ते ५

११ जुलै - बोरीवली पश्चिम : भारतीय जनता पक्ष आणि बोरीवली दैवज्ञ समाज आयोजित भव्य रक्तदान शिबिर, उद्घाटक - गोपाळ शेट्टी (खासदार उत्तर मुंबई), प्रमुख उपस्थिती सुनील राणे (आमदार बोरीवली विधानसभा) / साईली कॉलेज, एम.एच.बी. कॉलनी, गोराई रोड, बोरीवली पश्चिम / १० ते २

येथे संपर्क साधा

‘लोकमत’च्या रक्तदानाच्या महायज्ञात सहभागी होणाऱ्या संस्था किंवा संघटनांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आदी मुंबई महानगर प्रदेशात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यासाठी रोनाल्ड डिसोझा यांना ९०८२९९६५८३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

या संकेतस्थळावर नोंदणी करा

http://bit.ly/lokmatblooddonation