मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील शिवसेना शाखा क्रमांक ३७ तर्फे मालाड पूर्व कुरार येथील जिजामाता शाळेत रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार गजानन कीर्तिकर व आमदार सुनील प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे शानदार आयोजन केले होते. रक्तदान शिबिरात १५२ पिशव्या रक्तसंकलन झाले.
आमदार सुनील प्रभू म्हणाले की, राज्यात कोरोना काळात रक्ताची टंचाई भासत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदान शिबिर आयोजित करण्याचे आवाहन केले. त्याला राज्यातील जनतेने भरभरून प्रतिसाद दिला. दिंडोशीकरांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला.
लोकमतचे संस्थापक व स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त २ जुलैपासून लोकमत समूहाने राज्यात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ५१००० तर मुंबईत ८००० रक्तपिशव्या संकलन करून विक्रम केला, असे गौरवोद्गार आमदार सुनील प्रभू यांनी काढले. दिंडोशीच्या समस्या आणि शिवसेनेचे लोकोपयोगी उपक्रम मांडणाऱ्या दैनिक लोकमतचे त्यांनी कौतुक केले.
या रक्तदान शिबिराला मुंबईचे उपमहापौर ॲड. सुहास वाडकर यांनी भेट देऊन शाखाप्रमुख मनोहर राणे आणि लोकमतचे कौतुक केले. या रक्तदान शिबिराला शाखाप्रमुख मनोहर राणे, महिला शाखा संघटक रुपाली शिंदे, शाखा समन्वयक विजय जठार, महिला शाखा समन्वयक अनिता कदम, उपशाखा सहसमन्वयक नूतन राय, युवा शाखा अधिकारी प्रथमेश काडगे, युवती शाखा अधिकारी श्रुती सातरडेकर, रोशनी लांजेकर आदी उपस्थित होते.
फोटो ओळी
रक्तदात्याचा प्रमाणपत्र देऊन गौरव करताना डावीकडून शाखाप्रमुख मनोहर राणे, महिला विधानसभा संघटक पूजा चौहान, युवासेना विधानसभा समन्वयक रुपेश परब, आमदार सुनील प्रभू, विधानसभा संघटक प्रशांत कदम आदी.