लोकमतच्या महारक्तदान शिबिराला महामुंबईतून उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:07 AM2021-07-07T04:07:56+5:302021-07-07T04:07:56+5:30
मुंबई : लोकमतच्या वतीने 'नातं रक्ताचं नातं, जिव्हाळ्याचं' या मोहिमेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या रक्तदान शिबिराला महामुंबई परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने ...
मुंबई : लोकमतच्या वतीने 'नातं रक्ताचं नातं, जिव्हाळ्याचं' या मोहिमेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या रक्तदान शिबिराला महामुंबई परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. राज्यात भासत असलेला रक्ताचा तुटवडा भरून निघावा तसेच गरजू रुग्णांना वेळेवर रक्त मिळावे यासाठी लोकमतच्या वतीने १ जुलै ते १६ जुलै या कालावधीत राज्यभरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. कोरोनामुळे मागील वर्षभर राज्यभरात रक्ताचा तुटवडा भासत आहे. येत्या काळात रक्ताअभावी कोणत्याही रुग्णाला अडचण येऊ नये यासाठी राज्याकडे जास्तीत जास्त रक्त साठा असणे गरजेचे आहे. यासाठी या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
रक्तदान शिबिराची ठिकाणे
तारीख /उपनगर/ सहयोगी संस्था / पत्ता / वेळ
७ जुलै - अंबरनाथ : ॲडिशनल अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर असोसिएशन / एएमएमए वेल्फेअर सेंटर, अंबरनाथ एमआयडीसी, अंबरनाथ / १० ते ४
-----------------
८ जुलै - बी के सी : भारत डायमंड बोर्स / ट्रेडिंग हॉल ( टॉवर एच वेस्ट ), भारत डायमंड बोर्स, बी के सी / ९ ते ५
-----------------
९ जुलै - बी के सी : भारत डायमंड बोर्स / ट्रेडिंग हॉल ( टॉवर एच वेस्ट ), भारत डायमंड बोर्स, बी के सी / ९ ते ५
९ जुलै - डहाणू : अदानी डहाणू औष्णिक ऊर्जा केंद्र, एडीपीटीसी, डहाणू / अदानी डहाणू औष्णिक ऊर्जा केंद्र टेक्निकल ट्रेनिंग सेंटर, डहाणू, पालघर / ९:३० ते ५
-----------------
१० जुलै - जोगेश्वरी पूर्व : दशरथ गुरुनाथ मोरे, अध्यक्ष श्यामनगरचा राजा व्यासपीठ, सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ, शामनगर / शामनगरचा राजा व्यासपीठ, जोगेश्वरी पूर्व / सायंकाळी ५:३०
१० जुलै - खारघर : श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स, सेक्टर ३३ प्लॉट नंबर १, उत्सव चौक - सीआयएसएफ रोड, खारघर नवी मुंबई / ९ ते १
येथे संपर्क साधा
'लोकमत'च्या रक्तदानाच्या महायज्ञात सहभागी होणाऱ्या संस्था किंवा संघटनांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आदी मुंबई महानगर प्रदेशात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यासाठी रोनाल्ड डिसोझा यांना ९०८२९९६५८३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
या संकेतस्थळावर नोंदणी करा
http://bit.ly/lokmatblooddonation