Join us

‘माझा मोदक’ झोनला उत्स्फुर्त प्रतिसाद; ‘लोकमत सखी मंच’ व ‘माझा’ यांच्या सहयोगाने उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2019 1:45 AM

माझा जे कोका-कोला इंडिया कंपनीचे मंगोलिशिअस पेय आहे आणि ‘लोकमत’ महाराष्ट्रचं नं. १ वृत्तपत्र हे वेळोवेळी विविध उपक्रम राबवित आहेत.

मुंबई : गणेशोत्सव महाराष्ट्राचा सर्वात मोठा उत्सव. या उत्सवाचा एक अविभाज्य घटक म्हणजे ‘मोदक’. तळलेले असो किंवा उकडलेले, माव्याचे असो किंवा खव्याचे, मोदकाची लज्जतच निराळी. ‘माझा’च्या सहकार्याने ‘लोकमत माझा मोदक’ ३ ते ११ सप्टेंबर रोजी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ येथे ‘माझा मोदक’ झोन उभारण्यात आला होता.

या झोनमध्ये प्रेक्षकांनी ‘माझा’ पेयाच्या बॉटल्ससह सेल्फी काढून #maazamodak वर अपलोड केले गेले. या वेळी विविध स्पर्धांमध्ये प्रेक्षक सहभागी होऊन भरपूर बक्षीसेही जिंकत होते. दिवसभर या झोनवर प्रेक्षकांची झुंबड उडाली होती. सर्व वयोगटातील लोक या झोनला भेट देऊन माझा बॉटलसह सेल्फी घेण्यासाठी गर्दी करत होती. माझाची बॉटल मिळताच प्रेक्षकांनी लगेचच माझा या पेयाचा आस्वाद घेतला. ‘माझा’ पेय हे अल्फोन्सो मँगोपासून बनविला जातो. या झोनवर सुरू असणाऱ्या स्पर्धांमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढत होती. झोनमध्ये माझा बॉटल्सने तयार करण्यात आलेला अभिनव मोदक बघून प्रेक्षक या झोनकडे आकर्षित होत होते.

माझा जे कोका-कोला इंडिया कंपनीचे मंगोलिशिअस पेय आहे आणि ‘लोकमत’ महाराष्ट्रचं नं. १ वृत्तपत्र हे वेळोवेळी विविध उपक्रम राबवित आहेत. माझा मोदक या झोनचे विशेष आकर्षण म्हणजे या झोनला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अभिनेत्रींनी भेट दिली. अभिनेत्रींचे या झोनवर आगमन होताच गर्दी केलेल्या प्रेक्षकांमध्ये अधिक उत्साहाचे वातावरण दिसून आले. या अभिनेत्रींनी सर्व प्रेक्षकांमध्ये हिरीरीने सहभाग घेतला त्यांच्याबरोबर फोटोज काढले. या वेळी अभिनेत्रींनी माझाबद्दल बोलताना सांगितले की, त्यांचे सर्वात आवडीचे पेय माझा हे आहे. लोकमतच्या सखी या स्पर्धेत भाग घेत असून व्हिडिओ तयार करून #maazamodak वर अपलोड करत आहेत, असे भाष्य अभिनेत्रींनी केले. याशिवाय अभिनेत्रींनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. याप्रंसगी, गौरी नलावडे, प्राजक्ता माळी, जुई गडकरी, सुरूची अडारकर, समृद्धी केळकर या मराठी अभिनेत्रींनी सहभागी झाल्या होत्या.

टॅग्स :लोकमत