Join us

लसीकरण मोहिमेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 4:08 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महिलांना लस घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी शुक्रवारी महापालिकेमार्फत विशेष सत्र आयोजित करण्यात आले होते. त्यानुसार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : महिलांना लस घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी शुक्रवारी महापालिकेमार्फत विशेष सत्र आयोजित करण्यात आले होते. त्यानुसार सरकारी आणि महापालिका लसीकरण केंद्रांवर दिवसभरात तब्बल एक लाख २७ हजार महिलांनी कोविड प्रतिबंधक लस घेतली.

मुंबईत लसीकरण सुरू झाल्यानंतर मागील सात महिन्यांत ४५ लाखांहून अधिक पुरुषांनी लस घेतली आहे. तर ३५ लाख महिलांनी लस घेतली आहे. महिलांमध्ये दुसरा डोस घेण्याचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येते. त्यामुळे महिलांना सहज लस उपलब्ध करून दिल्यास मोठ्या प्रमाणात महिला वर्ग या संधीचा लाभ घेईल. यासाठी सर्व लसीकरण केंद्रे शुक्रवारी महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली होती.

मुंबईतील ४५७ लसीकरण केंद्रांवर दिवसभरात एक लाख ५२ हजार ४३५ नागरिकांनी लस घेतली. यापैकी ७४ हजार ६१९ लोकांनी पहिला डोस तर ७७ हजार ८१६ लोकांनी दुसरा डोस घेतला. यामध्ये महिलांचे प्रमाण एक लाख एवढे होते. आतापर्यंत एक कोटी ९८ हजार ८३ नागरिकांनी लस घेतली आहे. यापैकी ३३ लाख ३१ हजार ६४० लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत.

१८ वर्षांवरील लाभार्थी - ९५ लाख

पहिला डोस - ७६,५४,४४३

दुसरा डोस - ३३,३१,६४०

शुक्रवारी लस घेतलेल्या महिला लाभार्थी - एक लाख

स्तनदा मातांचे लसीकरण - ८,५१९

पहिला डोस - ७,११६

दुसरा डोस - १,४०३

गर्भवती महिलांचे लसीकरण - १,४३८

पहिला डोस - १,२०४

दुसरा डोस - २३४