आंबोलीतील रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:05 AM2021-07-05T04:05:22+5:302021-07-05T04:05:22+5:30

मुंबई : राज्यावरील रक्तसंकट दूर करण्यासाठी लोकमतने ‘रक्ताचं नातं’ हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. रविवारी आंबोलीतील युवकांनी त्यास ...

Spontaneous response of youth to blood donation camp in Amboli | आंबोलीतील रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आंबोलीतील रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Next

मुंबई : राज्यावरील रक्तसंकट दूर करण्यासाठी लोकमतने ‘रक्ताचं नातं’ हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. रविवारी आंबोलीतील युवकांनी त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिवसेना शाखा क्रमांक ६५, शिवसैनिक प्रसाद कोरगावकर आणि युवा उपशाखा अधिकारी दीपेश तावडे यांच्या सहकार्याने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत’ने २ ते १५ जुलै या कालावधीत ‘रक्ताचं नातं’ हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. राज्यभरात त्यानिमित्त भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जात आहे. अंधेरी पश्चिम येथील आंबोली-म्हातारपाडा परिसरात रविवारी शिवसैनिकांच्या सहकार्याने शिबिर पार पडले.

यावेळी विधानसभा संघटक संजय कदम, विधानसभा समन्वयक सुनील खाबिया, उपविभाग प्रमुख प्रसाद अहिरे, उपविभाग संघटिका संजीवनी घोसाळकर, माजी नगरसेवक विष्णू कोरगावकर, माजी नगरसेविका ज्योती सुतार, शाखाप्रमुख दयानंद कड्डी, उपशाखाप्रमुख जॉनी रोझारियो, युवा विभाग अधिकारी रमेश वांजळे, युवती विभाग अधिकारी सुप्रिया बंगलेकर, युवा उपविभाग अधिकारी प्रसाद मोगरे, गीतेश्री गोसावी, जितेंद्र गोसावी, कृत्विका कोंडके, साक्षी कांबळे, तसेच शिवसैनिक आणि युवासैनिक उपस्थित होते. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई संस्थापक असलेल्या मीनाताई ठाकरे रक्तपेढीचे विशेष सहकार्य या शिबिराला लाभले.

मी आयुष्यात पहिल्यांदाच रक्तदान केले. त्यासाठी लोकमतचे मनापासून आभार, कारण त्यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली. यापुढे नियमित रक्तदान करण्याचा संकल्प यानिमित्ताने मी करते.

- साक्षी कोरगावकर, रक्तदात्या

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केल्यापासून शिवसैनिकांनी राज्यभरात रक्तदानाचा सपाटा लावला आहे. त्यास लोकमतची साथ मिळाल्याने अधिकाधिक नागरिकांना सहभागी करून घेता आले. बाबूजींच्या स्मृतिप्रीत्यर्थ लोकमत समूहाने हाती घेतलेल्या या रक्तदान यज्ञाला मनापासून शुभेच्छा.

- सुनील खाबिया, विधानसभा समन्वयक, अंधेरी पश्चिम

स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा बाबूजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त लोकमतने हाती घेतलेली ही मोहीम कौतुकास्पद आहे. शिवसैनिकांचे अशा उपक्रमांना कायम सहकार्य राहील. शाखा क्रमांक ६५ने रक्तदान शिबिराच्या जोडीला मोफत आरोग्य आणि नेत्र तपासणी शिबिर आयोजित करून उपक्रमाचे महत्त्व आणखी वाढविले.

- प्रसाद अहिरे, उपविभाग प्रमुख, शिवसेना

Web Title: Spontaneous response of youth to blood donation camp in Amboli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.