मुंबई : रोटरॅक्ट क्लब ऑफ बॉम्बे नॉर्थ वेस्ट मालाड, रोटरॅक्ट क्लब ऑफ दहिसर कोस्ट, रोटरॅक्ट क्लब ऑफ घनश्यामदास सराफ कॉलेज, रोटरॅक्ट क्लब ऑफ बॉम्बे कांदिवली, रोटरॅक्ट क्लब ऑफ बॉम्बे फिल्म सिटी व लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी मालाड येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एकूण १७ जणांनी रक्तदान केले.
स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी नवजीवन ज्युनिअर कॉलेजमध्ये आयोजित रक्तदान शिबिरात तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. नातं रक्ताचं नातं जिव्हाळ्याचं या उपक्रमांतर्गत विशेषतः तरुणाई रक्तदानासाठी पुढाकार घेत आहे.
मालाड येथे आयोजित रक्तदान शिबिराला रोटरी अध्यक्ष सलोनी शाह, रोटरॅक्टर नावेल नझारेथ, दीपिका बागल, रीचा भावसार, विश्व शर्मा, हार्दिक कडेल, यश सावला, सपना गुसैन, विकी गुप्ता, सपना राठोड या स्वयंसेवकांनी विशेष उपस्थिती लावून लोकमतच्या रक्तदान शिबिराला शुभेच्छा दिल्या. यावेळी नवेल नझरेथ, रिचा भावसार यांनी रक्तदाते यश शर्मा यांचे स्वागत केले.
मालाड येथे आयोजित रक्तदान शिबिरात रोटरॅक्ट क्लब ऑफ बॉम्बे नॉर्थ वेस्ट मालाड, रोटरॅक्ट क्लब ऑफ दहिसर कोस्ट, रोटरॅक्ट क्लब ऑफ घनश्यामदास सराफ कॉलेज, रोटरॅक्ट क्लब ऑफ बॉम्बे कांदिवली, रोटरॅक्ट क्लब ऑफ बॉम्बे फिल्म सिटीच्या सर्व स्वयंसेवकांनी सहभाग घेतला.
फोटो ओळ - मालाड येथे आयोजित रक्तदान शिबिरात रोटरॅक्ट क्लब ऑफ बॉम्बे नॉर्थ वेस्ट मालाड, रोटरॅक्ट क्लब ऑफ दहिसर कोस्ट, रोटरॅक्ट क्लब ऑफ घनश्यामदास सराफ कॉलेज, रोटरॅक्ट क्लब ऑफ बॉम्बे कांदिवली, रोटरॅक्ट क्लब ऑफ बॉम्बे फिल्म सिटीच्या सर्व स्वयंसेवकांनी सहभाग घेतला.