पालिकेचा रुग्णांच्या जीवाशी खेळ

By Admin | Published: January 3, 2016 12:34 AM2016-01-03T00:34:14+5:302016-01-03T00:34:14+5:30

महापालिकेच्या वाशी रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे अपघातग्रस्त व इतर अजारांनी त्रस्त गरीब रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू होऊ लागला आहे. अपघातग्रस्तांनाही

Sports with the patient's life | पालिकेचा रुग्णांच्या जीवाशी खेळ

पालिकेचा रुग्णांच्या जीवाशी खेळ

googlenewsNext

इंडिया विरुद्ध भारत : परिसंवादातील निघाला सूर
अमरावती : राष्ट्रपिता महात्मा गांधींनी म्हटले होते की, खरा भारत हा खेड्यात राहतो. खेड्यांचा व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा विकास झाला तरच भारताची प्रगती होईल. परंतु सद्यस्थितीत जागतिकरणाच्या युगात शहरीकरण झाले आहे व सर्व अत्याधुनिक सुविधा शहरात झाली. भारत स्वतंत्र झाला तेव्हा ३५ कोटी लोकांपैकी २८ कोटी लोक खेड्यात राहत होते. तेव्हा शेतीचा विकासाचा दर ५८ टक्के होता. पण आता ७० टक्के लोक शेतीवर आधारित असतानाही ग्रामीण भागाचा विकास नाही. त्यामुळे इंडिया विरुद्ध भारत, अशी स्थिती झाली आहे. याविषयावर जागतिक मराठी अकादमी 'शोध मराठी मनाचा' संमेलनात व्यासपीठावर या क्षेत्रातील तज्ज्ञांना आयबीएन 'लोकमत'चे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे व पत्रकार व कवी विजय चोरमारे यांनी त्यांना बोलते केले.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक श्याम मानव, केंद्रीय कार्यकारिणीचे उपाध्यक्ष गिरीश गांधी व जेष्ट साहित्यिक उल्हास पवार यांनी इंडिया विरुद्ध भारत या विषयावर अभ्यासू विचार उपस्थितांसमोर ठेवले. ज्येष्ठ साहित्यिक उल्हास पवार म्हणाले की, काँग्रेस पक्ष देशाच्या उदयाला कारणीभूत आहे. काही चुका झाल्या असतील पण विकासही देशाचा झाला आहे. त्यावेळेस गांधीजी मानवता, समता, सामाजिक नीतिमूल्य जपणारे होते. ते टिळकांना भेटले तेव्हा त्यांना सांगितले होते की, हिमालयाला भेटलो व गोखलेंना भेटलो तेव्हाच जलगंगेला भेटला. हा किस्सा ऐकवीत ते पुढे म्हणाले की, अमरावती शहर म्हणजे गाडगेबाबा, तुकडोजी महाराज व गुलाबराव महाराजांच्या आशीर्वादाने या शहराला प्रेरणा मिळाली. परंतु आजची व्यवस्था ही चंगळवादी झाली आहे. भारतीय लोकांची मानसिकता बदलण्याची वेळ आहे. जगातील सर्व मोठी लोक हे ग्रामीण भारतातील असून जोपर्यंत आपण इंडिया व भारत समजून घेणार नाही तोपर्यंत यामधील दुरी कमी होणार नसल्याचे ते म्हणाले. श्याम मानव चर्चेत भाग घेत म्हणाले, आपण सध्या विकासाची चर्चा करतो आहे. सध्या खुल्या बाजार व्यवस्थेमध्ये शोषण करणारा म्हणजे इंडिया व शोषित होणारा म्हणजे भारत, अशी व्याख्या केली. त्यावेळेस बाजार पद्धत उपलब्ध नव्हत्या म्हणून शेतकरी तीन पायल्या देऊन दोन पायल्या घेऊन यायचे. पण आज तो चार पायल्या दिल्या तर एक पायली घेऊन येतो, अशी परिस्थिती झाली आहे. खुल्या अर्थव्यवस्थेने ही दरी वाढविली आहे. गांधीजी जिवंत असते तर भारताचे इंडिया होऊ दिला नसता, असा उल्लेखही त्यांनी केला. पंडित जवाहरलाल नेहरूंनी आधुनिक भारताचा पाया रोवला व जगातील सर्वात मोठी लोकशाही स्वीकारली.
पुढे बोलताना ते म्हणाले की, मी यवतमाळ जिल्ह्याचा आहे. येथे सर्वात जास्त आत्महत्या झाल्या आहेत. जोपर्यंत शेतमालाला त्याच्या उत्पादन मूल्यानुसार बाजारभाव उपलब्ध करून देणार नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाही. गिरीश गांधी आपले अभ्यासू विचार मांडत म्हणाले की, नेहरुजींच्या काळात पहिली पंचवार्षिक योजना करण्यात आली. ही शेतीप्रधान व कृषिप्रधानला महत्त्वाचे स्थान देण्यात आले होते. परंतु अलीकडच्या काळात शेतकऱ्यांवर अन्याय होत गेले. खेड्यात ग्रामीण भारत आहे. हे राजकारण्यांनी समजून घेतले नाही. पाणी अडवा पाणी जिरवा ही योजना राबवितात. पण आता पाणी अडवा व नेत्यांची जिरवा असे सुरू असल्याचे त्यांनी विनोदाने सांगितले.
आधी खेडी सुरक्षित होती. पण आता शहरात सुविधा आहेत. खेड्यांमध्ये उत्तम रस्ते, दवाखाने, चांगले शिक्षण दिले असते तर भारताचा इंडिया झाला नसता व एवढी दुरी निर्माण झाली नसती. अण्णा हजारेबद्दल मतभेद काहीही असो. पण राळेगणसिद्धीमध्ये कुठल्याही पाणठेल्यावर तंबाखू मिळू नये. हे ग्रामीण भारतातील अण्णांनी सिद्ध केलेले मोठे यश आहे. अण्णा हजारेंनी ग्रामीण भारताला महत्व पटवून दिले, असा उल्लेखही गांधींनी यावेळी केला.
यावेळी भरत दौंडकर (पुणे) या युवा कवींनी ‘गोफ’ ही शेतकऱ्यांच्या वेदना सांगणारी कविता सादर करुन उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले तर आदिवासी कवी तुकाराम धांडे यांनी ‘साइब’ ही कविता सादर करून श्रोत्यांची वाहवा मिळविली. संचालन साहित्यिक रामदास फुटाणे यांनी केले तर आभार सोमेश्वर पुसदकर यांनी मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Sports with the patient's life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.