मुंबई : मनपा शाळेतील क्रीडा सराव प्रभावी व्हावा. विद्यार्थ्यांमध्ये स्वत:च्या पलीकडे जाण्याची वृत्ती निर्माण व्हावी. संघभावना वाढीस लागण्यासह क्रीडा चैतन्य विकसित व्हावे; यादृष्टीने विद्यार्थ्यांना या वर्षापासून क्रीडा गणवेश देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. एखाद्या ठरावीक क्रीडा प्रकारात गती असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांना खेळताना वेगळा असा क्रीडा गणवेश आतापर्यंत नव्हता. हे लक्षात घेऊन क्रीडा गणवेश देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.महापालिकेच्या अकराशेपेक्षा अधिक शाळांमधून साडे तीन लाख विद्यार्थी ज्ञानाचे धडे गिरवित आहेत. आता या नव्या उपक्रमामध्ये लाल, निळा, हिरवा किंवा पिवळा अशा चार रंगांपैकी एका रंगाच्या टी-शर्टचा समावेश असलेल्या गणवेशांमुळे मैदानांवर अभिनव क्रीडा चैतन्य दिसून येत आहे, असे अतिरिक्त महापालिका आयुक्त आबासाहेब जºहाड यांनी सांगितले.क्रीडा गणवेश ठरविताना विद्यार्थ्यांचे काही गट तयार करून व प्रत्येक गटाचा एक रंग निश्चित करून देण्याची पद्धत आहे. गटांना रंगांच्या नावासह हाउस असे म्हटले जाते. उदाहरणार्थ; रेड हाउस, ब्ल्यु हाउस, ग्रीन हाउस किंवा यलो हाउस. रंग आधारित हाउसनिहाय विभागणीमुळे विविध खेळ खेळताना संघ भावना तयार होण्यास मदत होते. यानुसार विद्यार्थ्यांचेही चार गट तयार करून त्यांना चार रंगांचे क्रीडा गणवेश देण्यात आले आहेत. या अंतर्गत प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांची चार गटांमध्ये विभागणी करून, त्या प्रत्येक गटातील विद्यार्थ्यास लाल, निळा, हिरवा किंवा पिवळा अशा चार रंगांपैकी एका रंगाच्या टी-शर्टसह क्रीडा गणवेश देण्यात आला आहे.शनिवारी विविध क्रीडा प्रकारांचा सराव घेतला जातो. क्रीडा प्रकारांचा नियमित सराव आणि आठवड्यातून एक दिवस घेतला जाणारा विशेष सराव यादरम्यान क्रीडा शिक्षक विद्यार्थ्यांना क्रीडा प्रकारांच्या वैशिष्ट्यांची प्रात्यक्षिकांसह माहिती देऊन खेळांचा सराव करवून घेतात.दर शनिवारी घेतल्या जाणाºया विशेष सरावादरम्यान या वर्षापासून देण्यात आलेला क्रीडा गणवेश असणे अनिवार्य करण्यात आले आहे.>गणवेश टिकाऊ कापडापासून तयारक्रीडा गणवेशात टी-शर्ट, ट्रॅक पॅन्ट व कापडी बूट यांचा समावेश आहे. टी-शर्ट व ट्रॅक पॅन्ट टिकाऊ कापडापासून तयार करण्यात आली आहे.क्रीडा प्रकारांचा सराव करण्यासाठी सोमवार ते शुक्रवारदरम्यान आवश्यकतेनुसार व विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार एक किंवा अधिक तासिका राखून ठेवण्यात येतात.
विद्यार्थ्यांना या वर्षापासून क्रीडा गणवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 3:01 AM